घरदेश-विदेशडी. के. शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामैय्या - नलीन कुमार कटील

डी. के. शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामैय्या – नलीन कुमार कटील

Subscribe

दक्षिण कन्नड लोकसभा मतदार संघाचे खासदार आणि कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर होणाऱ्या कारवाईमागे सिद्धरामैय्या यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

डी. के. शिवकुमार यांची प्रगती पाहून सिद्धरामैय्या यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आणि राजकीय आकसापोटी त्यांनी मुख्यमंत्री असताना डी. के. शिवकुमार यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल केले असावेत, असे कटील म्हणाले. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आपल्यासाठी वंदनीय व्यक्ती असून राज्यातील कोणत्याही नेत्यासोबत आपले मतभेत नाहीत, असे नलीन कुमार कटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. डी. के. शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या विविध प्रकरणात सक्तवसुली संचालनाल्याने अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते चौकशीस सामोरे जात आहेत. डी के शिवकुमार कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री असून काँग्रेस-जेडीएसच्या आघाडी सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोठा वाट होता.

२०१८ निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितून बाहेर काढण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी आघाडी घेतली होती. कर्नाटकच्या बाहेरसुद्धा शिवकुमार संकट मोचक म्हणून अनेक वेळा सामोरे आहे. काँग्रेस-जेडीसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीला सावरण्यासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -