घरदेश-विदेशकर्नाटकात भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याचा नातू JDS कडून निवडणूक लढणार

कर्नाटकात भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याचा नातू JDS कडून निवडणूक लढणार

Subscribe

भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याचा नातू JDS कडून निवडणूक लढणार असल्यानं हा चर्चेचा विषय ठरलाय.

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येताच सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आणि काँग्रेसने आपापल्या उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या आहेत. प्रत्येक यादीसोबतच नेत्यांची नाराजीही वाढत चालली आहे, भाजपने अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले, त्यानंतर पक्षपरिवर्तनाची प्रक्रिया सुरूच आहे. भाजपच्या या उमेदवारी यादीत घराणेशाही झळकताना दिसून येतेय. घराणेशाहीवरून भाजप सातत्याने काँग्रेसची खरडपट्टी काढत असतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रत्येक निवडणुकीच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या घराणेशाहीवरून खिल्ली उडवत असतात. मात्र, कर्नाटकात भाजपकडून घराणेशाहीलाच प्रधान्य दिलेलं दिसत आहे.

भाजपच्या पहिल्या यादीबद्दल सांगायचे तर, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना त्यांच्या वडिलांची पारंपरिक जागा शिकारीपुरा येथून तिकीट देण्यात आले आहे. या जागेवर येडियुरप्पा यांच्या मुलाला मैदानात उतरवण्यावरून पक्षांतर्गत गदारोळ झाला होता, पण अखेर येडियुरप्पा यांची ताकद पाहून हायकमांडने विजयेंद्र यांना उमेदवारी दिली. या निर्णयानंतर विरोधकांनी घराणेशाहीवरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे नातू सुद्धा या निवडणूकीच्या मैदानात दंड थोपाटून उभे राहिले आहेत. भाजपला रामराम ठोकल्यानंतर जनता दल एस म्हणजेच कुमारस्वामी यांच्या पक्षात प्रवेश केला. भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांचे नातू एनआर संतोष यांना अरसीकेरे विधानसभचे तिकीट जेडीएसने दिले आहे. एनआर संतोष यांना गेल्या आठवड्यात भाजपने तिकीट नाकारले होते.

- Advertisement -

संतोष हे येदियुरप्पा यांच्या बहीणीचे नातू आहेत. येदियुरप्पाचे निकटवर्तीय म्हणून संतोष यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्यासोबत कामही केले आहे. ते अससीकेरे येथे तीन वर्षापासून समाज कार्यात सक्रिय आहेत. जेडीएसकडून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक होते. पण भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. संतोष यांच्या समर्थकांनी भाजपच्या विरोधात आंदोलन केलं. आपल्या नातवाचा तिकीट न दिल्याने येदियुरप्पा यांच्या बहीनींने आपल्या भावाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एचडी देवेगौडा यांनी संतोषला अर्सिकेरे मतदारसंघातून तिकीट देण्याचे आश्वासन दिले. हसन जिल्हा हा जेडीएसचा बालेकिल्ला असून, सात जागांपैकी सहा मतदारसंघांवर पक्षाचे नियंत्रण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -