घरदेश-विदेशकेरळ प्रलयातल्या देवदूताचा दुर्दैवी मृत्यू

केरळ प्रलयातल्या देवदूताचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

जिनीश पूनथुराचा रहिवासी असून तो मासेमारीचा व्यवसाय करत होता. जिनीश हा पहिला मदतगार होता जो चेनगुन्नुरमध्ये लोकांच्या मदतीसाठी आला होता. 'कोस्टल वॉरिअर' असा त्यांचा एक ग्रुप होता. या माध्यमातून त्याच्या अन्य मित्रांनी देखील लोकांची मदत केली

सप्टेंबरमध्ये आलेल्या महाप्रलयाने केरळवासियांचे जनजीवन विस्कळीत करुन टाकले. या प्रलयातून लोकांना सावरण्यासाठी देशवासीय केरळवासियांच्या पाठीशी उभे राहिले. या प्रलय काळात पुरातून लोकांना सुखरुप बाहेर काढणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जिनीश जेरॉन (२४) असे या मुलाचे नाव असून शुक्रवारी दुपारी त्याचा अपघातात मृत्यू झाला. जिनीश या तरुणाने अल्पूझा भागातील लोकांना बाहेर काढण्याचे काम केले होते.

जिनीशचा अपघाती मृत्यू

जिनीश आणि त्याचे मित्र तामिळनाडूला बाईकवरुन जात होते. उचकडा या ठिकाणी त्याची बाईक घसरली आणि तो पडला त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका लॉरीचा धक्का त्याच्या बाईकला बसला. त्याला तातडीने तिरुअनंतपुरम येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -
Kerala-fisherman_jineesh
पुरात अडकलेल्या लोकांना मदत करताना जिनीश

सगळ्यात आधी केली होती मदत

जिनीश पूनथुराचा रहिवासी असून तो मासेमारीचा व्यवसाय करत होता. जिनीश हा पहिला मदतगार होता जो चेनगुन्नुरमध्ये लोकांच्या मदतीसाठी आला होता. ‘कोस्टल वॉरिअर’ असा त्यांचा एक ग्रुप होता. या माध्यमातून त्याच्या अन्य मित्रांनी देखील लोकांची मदत केली. या प्रलयात त्याचे घर देखील उद्धवस्त झाले होते. त्यामुळे सध्या तो भाड्याचने दुसरीकडे राहत होता. बारावी शिकलेला जिनीश वयाच्या १५ व्या वर्षापासून मच्छीमार व्यवसायात आहे. कायम लोकांची मदत करण्यात तत्पर असलेल्या जिनीशचा असा दुर्दैवी मृत्यू होईल असे वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्याच्या शेजाऱ्यांनी दिली आहे.

पाहा-  महापुरातही ‘केरळ’ न डगमगता उभा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -