घरदेश-विदेश...आणि ती गेली घोड्यावर बसून परिक्षेला

…आणि ती गेली घोड्यावर बसून परिक्षेला

Subscribe

सध्या घोड्यावर बसून परिक्षेला जाणाऱ्या त्या १० वीच्या मुलीचा व्हीडीओ सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

केरळमधील १० वीच्या विद्यार्थींनीचा एक व्हीडीओ सध्या सोशसमिडीयावर तुफान व्हायरल होतोय. केरळमधली ही मुलगी चक्क परिक्षेला घोड्यावरून गेली. या व्हीडीओला सध्या सोशमिडीयावर उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही हा व्हीडीओ रिट्वीट केला आहे. या व्हीडीओ रिट्वीट करताना त्यांनी या मुलीचे खूप कौतूक केलं आहे.

- Advertisement -

मनोज कुमार यांनी हा व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर केला होता. हा व्हीडीओ पोस्ट करताना त्यांनी लिहीले की, हा व्हीडीओ मला व्हॉटसअपवर आला आहे. ही १०वीची मुलगी परिक्षेसाठी घोड्यावरून निघाली आहे. या पोस्टला उत्तर देताना रेडिओ जॉकी लिश्नाने या मुलीचे नाव ‘कृष्णा’ आणि घोड्याचे नाव ‘रामकृष्ण’ असल्याचे म्हटलं आहे.

- Advertisement -

आनंद महिंद्रा म्हणतात,

हा व्हीडीओ खूप शानदार आहे. या व्हीडीओ खूप व्हायरल व्हायला हवा. हा व्हीडीओ म्हणजे अतुल्य भारत च एक उदाहरण आहे. त्रिशूरमध्ये या मुलीला कोणी ओळखता का? मला स्क्रीन सेव्हरसाठी तीचे फोटो हवे आहेत. ती माझी हीरो आहे. तीच्या घोड्यावरून शाळेत जाण्यामुळे मला आशावादी बनवलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -