घरदेश-विदेशअमेरिका, युरोपमधून मिळतोय खलिस्तान्यांना पाठिंबा; कोण घालतयं चळवळीला खतपाणी?

अमेरिका, युरोपमधून मिळतोय खलिस्तान्यांना पाठिंबा; कोण घालतयं चळवळीला खतपाणी?

Subscribe

अमेरिका आणि युरोपमधील अल्पसंख्याक अतिरेकींचा एक अतिशय छोटा गट खलिस्तानच्या मागणीला खतपाणी घालत असल्याचे ब्लूम अहवालातून उघड झाले आहे.

जगभरातील खलिस्तानी समर्थकांच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता आलेल्या एका नवीन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, खलिस्तानी चळवळीला सध्या अमेरिका आणि युरोपमधील अल्पसंख्याक अतिरेक्यांच्या एका लहान गटाद्वारे प्रोत्साहन दिले जात आहे आणि त्यांना पाकिस्तानकडून आर्थिक मदत केली जात असल्याची धक्कादायक माहिती सुद्धा या अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. ( Khalistan is getting support from America, Europe)

पाश्चिमात्य देशांमधून मिळतोय पाठिंबा
ब्लूम अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, वेगळ्या खलिस्तानची मागणी करणारे दहशतवादी गट पाश्चिमात्य देशांमधील आहेत. यामध्ये विशेषत: ब्रिटनमध्ये असलेल्या लोकांचा यात समावेश आहे. कारण ब्रिटन हा एक असा देश आहे, ज्या देशाने पूर्णतः व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. पण या स्वातंत्र्याचा गैरवापर करण्यात येत असून भारतात सुरू असलेल्या खलिस्तानी चळवळीला या माध्यमातून खतपाणी घालण्यात येत आहे. तर ब्रिटनमध्ये स्थायिक असलेले हे खलिस्तानी समर्थक हे त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या नागरिकांवर सुद्धा हल्ले करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मणिपूरमधील हिंसाचार हा केरळ राज्याला बदनाम करण्याचा डाव, भविष्यात…; राष्ट्रवादीचा घणाघात

ब्लुम अहवालानुसार, परदेशात राहणारे बहुतांश शीख आणि भारतीय बंडखोरी आणि वेगळ्या खलिस्तानच्या मागणीला समर्थन देत नसल्याचेच दिसून येत आहे. ते प्रखर राष्ट्रभक्त आहेत आणि त्यांच्या भावना भारताच्या एकता आणि अखंडतेबाबतच्याच आहेत. खलिस्तान हे पाकिस्तानचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न आहे, असे देखील या अहवालात लिहिण्यात आले आहे.

- Advertisement -

ब्रिटनमधील गुरुद्वारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन गटांत चढाओढ
ब्रिटनमधील गुरुद्वारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही खलिस्तानी समर्थक आणि मोठ्या शीख संघटनांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर हिंसा आणि धमकावणे हे शीख धर्माच्या तत्त्वांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. परंतु ब्रिटन आणि जगभरातील खलिस्तान समर्थक शीख धर्माच्या विरोधात जाऊन धर्माचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती देखील या अहवालातून समोर आली आहे.

तसेच काही खलिस्तान समर्थकांनी गुरुद्वारांवर ताबा मिळवला आहे आणि या प्रार्थनास्थळांचा वापर हिंसाचार आणि द्वेषाचा प्रसार करण्यासाठी करण्यात येत आहे. तर या माध्यमातून ते पाकिस्तानला खूश करण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत. अतिरेकी विचारसरणीच्या तरुणांचे ब्रेनवॉश करून पंजाबमध्ये शीखांशी भेदभाव केला जात असल्याची खोटी माहिती या तरूणांना देण्यात येत आहे. पण पंजाबमध्ये असे काहीच होत नसल्याचे सुद्धा या अहावालातून माहिती देत स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -