घरमहाराष्ट्रशरद पवार अध्यक्षपद कसं सोडतील? राजीनामा ही एक नौटंकी होती; चंद्रशेखर बावनकुळेंचा...

शरद पवार अध्यक्षपद कसं सोडतील? राजीनामा ही एक नौटंकी होती; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार हे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार दुसऱ्याला कसे पक्षाचे अध्यक्ष होऊ देतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ते सर्व एक स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आणि देशभरातील नेत्यांच्या आग्रहानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. त्यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी पवारांचा राजीनामा हे केवळ नाटकं असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ( Pune Sharad pawar will not allow anybody to be president of NCP that was 3 days of nautanki )

कसबा मतदार संघामध्ये बूथ प्रमुखांचा महामेळावा बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी संपन्न झाला. त्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. मेळाव्याला पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राजेश पांडे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी घटना बदलली. राज्यात अशा अनेक शिक्षण आणि सहकारी संस्था आहेत ज्यांच्या घटना बदलून शरद पवार हे अध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे शरद पवार दुसऱ्याला कसे पक्षाचे अध्यक्ष होऊ देतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडले ते सर्व एक स्क्रिप्ट होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा तीन दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी आणि घरगुती तमाशा होता. अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे.

दुसऱ्यांनी उभ्या केलेल्या सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षण संस्थांचे अध्यक्ष होण्यासाठी ज्या लोकांनी घटना बदलली ते स्वत:च्या पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्याला कसं होऊ देतील. रयत हे फक्त एक उदाहरण आहे, अशी 50 नावं आपल्याला सांगता येतील, यावर एक पुस्तक लिहिता येईल, असं देखील बावनकुळे म्हणाले आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: आता कोणी ‘हिंदुत्ववादी सरकार’च्या राज्यातील महाराष्ट्र स्टोरी बनवेल का? काँग्रेसचा सवाल )

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात 16 आमदारांच्या निलंबनावर या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता आहे. यावरदेखील बावनकुळे यांनी प्रतिक्रया दिली आहे. उद्या जर विधानमंडळात बहुमत सिद्ध करायला सांगितले तर माझा दावा आहे 184 पेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात ऑक्टोबर 2024 पर्यंत आमचं सरकार टिकेल आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसेनेच्या युतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -