घरट्रेंडिंगपरिक्षेच्या सहा तास आधी दिला बाळाला जन्म, बाळाला कुशीत घेऊन दिली परिक्षा

परिक्षेच्या सहा तास आधी दिला बाळाला जन्म, बाळाला कुशीत घेऊन दिली परिक्षा

Subscribe

लग्न झाले, मुले झाली की मुलींना शिक्षण पूर्ण करणे जमत नाही असे म्हटले जाते. बाई तिच्या संसारात पडते आणि शिक्षण, परिक्षा या सगळ्यापासून दूर राहते. मात्र या व्याख्येला तडा देत बिहार मधील एका महिलेने कौतुकास्पद काम केले आहे. गर्भवती असताना ती इंटर परिक्षासाठी अर्ज भरला होता. मात्र परिक्षेच्या दिवशीच महिलेची प्रसृती झाली. परिक्षेच्या सहा तास आधी महिलेने बाळाला जन्म दिला आणि ती थेट परिक्षा सेंटरला पोहचली. नवजात बाळाला कुशीत घेऊन या महिलेने चक्क परिक्षाही दिली. आपल्या नवजात बाळाला घेऊन परिक्षा देणाऱ्या आईला उपस्थित सर्वांनी सलाम केला. उत्तर प्रदेशच्या तरैया प्रखंड येथील नारायणपूर येथे ही महिला राहत होती. ही महिला इंटरमीडिएटच्या परिक्षेला बसली होती. परिक्षेच्या पहिल्या दिवशीच तिला प्रसूती वेदना सुरु झाल्या. तिने रुग्णलयात गोड बाळाला जन्म दिला. मात्र तिची परिक्षा देणे बाकी होते. आपल्या नवजात बळाला घेऊन महिलेने परिक्षा सेंटरमध्ये जाऊन परिक्षा दिली. महिलेच्या या अनोख्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कुसुम कुमारी असे या महिलेचे नाव आहे. पानापूर येथील टोटहा जगतपूर येथे राहणाऱ्या राजदेव राय याच्याशी गेल्या वर्षी तिचा विवाह झाला होता. विविह झाला त्या वेळी कुसुम इंटर परिक्षा देत होती. तिला चांगले सासर मिळाल्याने लग्न झाल्यानंतरही तिला शिक्षण घेता आले. सासरी येऊनही तिचा अभ्यास सुरु राहिला. १ फेब्रुवारी २०२१ ला इंटर परिक्षा सुरु झाली. कुसुमने भूगोलाचा पहिला पेपर दिला होता. त्यानंतर तिला प्रसुती वेदना सुरु झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री कुमुसने एका गोड मुलाला जन्म दिला. तिची नार्मल डिलिव्हरी करण्यात आली. बाळ आणि कुसुम दोघेही सुखरुप असल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांना तिच्या परिक्षेची काळजी लागली. कुसुमनेही तिला परिक्षा द्यायची असल्याचे सांगितले. त्यानुसार कुटुबीयांनी कुसुमला परिक्षा सेंटरल पोहचण्यासाठी गाडीची व्यवस्था केली. रूग्णालयाने सद्य परिस्थिती पाहून कुसुमला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.

- Advertisement -

कडाक्याच्या थंडीतही कुसुम आपल्या बाळाला घेऊन परिक्षा द्यायला आली. कुसुम आणि तिच्या बाळाची सर्वत्र चांगलीच चर्ची रंगली आहे. कुटुंबियांनी कुसुम परिक्षा सेंटरवर मुलगा झाला म्हणून आनंदात सर्वांना पेढेही वाटले. कुसुम आणि तिच्या कुटुंबियांचे सगळे कौतुक करत आहेत.


हेही वाचा – आधार कार्ड स्टाईलमध्ये छापला लग्नाचा मेन्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -