घरताज्या घडामोडीlakhimpur kheri: दिमाग खराब हे क्या?, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या अटकेवरुन प्रश्न विचारल्याने...

lakhimpur kheri: दिमाग खराब हे क्या?, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या अटकेवरुन प्रश्न विचारल्याने शिवीगाळ

Subscribe

भाजपचे खासदार आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना त्यांच्या मुलाच्या अटकेवरुन प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांना शिवीगाळ केली आहे. तसेच त्यांच्या हातातील माईकही खेचला होता. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने लखीमपुरमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले होते. यामध्ये काही शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. शेतकऱ्यांवर सुनियोजीत गाडी घातली असल्याचे चौकशीत कबुल करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांना एका पत्रकाराने त्यांच्या मुलाला अटक करण्यात आल्यासंबंधात प्रश्न विचारला होता. मुलाविरोधात नवीन आरोप करण्यात येत असल्याचे पत्रकाराने म्हटले, यावर मंत्री चिड़ून मूर्खासारखे काहीही प्रश्न विचारु नका, डोकं फिरलंय का? असे म्हणाले आणि पत्रकाराच्या हातातील माईकसुद्धा खेचून घेतला होता. मिश्रा यांचा या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उत्तर प्रदेशमधील लखीमपुर दौऱ्यावर होता. ३ ऑक्टोबर रोजी लखीमपुरमध्ये गाडीने जात असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होते. या आंदोलनातील शेतकऱ्यांवरच अजय मिश्राने गाडी घातली होती. या घटनेमध्ये एकूण ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते.

हानी पोहचवण्याच्या उद्देशानेच शेतकऱ्यांची हत्या

लोकांकडून एका ठराविक उद्देशाने तसेच हत्यारांचा वापर करत हानी पोहचवण्याच्या उद्देशानेच हा गुन्हा करण्यात आल्याचा ठपका एसआयटीने ठेवला आहे. हा गुन्हा जाणीवपूर्वक करण्यात आलेला असून अनावधानाने घडलेला नसल्याचेही एसआयटीचे चौकशी अधिकारी विद्याराम दिवाकर यांनी चौकशीअंती स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा : Lakhimpur Kheri : लखीमपूर खेरीत SUV ने शेतकऱ्यांना जाणीवपू्र्वक चिरडले, SIT चौकशीतून खुलासा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -