घरदेश-विदेशभारताच्या 'या' राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही!

भारताच्या ‘या’ राज्यात एकही कोरोना रुग्ण नाही!

Subscribe

हा एकमेव केंद्र शासित प्रदेश आहे जिथे कोरोनाने शिरकाव केलेला नाही.

संपूर्ण जग सध्या कोरोनाशी लढत आहे. भारतात आतापर्यंत ७ लाख लोकांचा या महामारीने बळी गेला आहे, परंतु भारतात असे एक राज्य आहे जिथे आजपर्यंत एकाही व्यक्तीला या जीवघेण्या विषाणूची लागण झालेली नाही. होय.. हे सत्य आहे. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप असं एकच राज्य आहे, जिथे कोरोना विषाणूचा एकही संसर्गग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. हा एकमेव केंद्र शासित प्रदेश आहे जिथे कोरोनाने शिरकाव केलेला नाही.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रसार देशभर झाला आहे, मात्र लक्षद्वीप या संकटातून कसे बचावले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना तेथील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वप्रथम आम्ही येथे पर्यटकांच्या येण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
या व्यतिरिक्त त्यांनी असेही सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर तेथील कायमस्वरुपी नागरिकांना येथे परत येण्याची परवानगी देण्यात आली. इतकेच नाही तर याआधीच त्या नागरिकांना कोरोना टेस्टही करावी लागली आणि निगेटिव्ह आढळल्यानंतरच त्यांना परत येण्याची परवानगी देण्यात आली.

आतापर्यंत देशात ७ लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली असून ७ लाख १९ हजार ६६५ लोकं कोरोना बाधित आहेत. तर मृतांची संख्या २० हजार १६० वर पोहोचली आहे. तसेच कोरोनाविरूद्धच्या लढाईत आतापर्यंत ४ लाख ३९ हजार ९४८ लोकांनी कोरोनावर हरवलं आहे.

- Advertisement -

रिकव्हरी रेट ६१ टक्क्यांहून अधिक

भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढीसह, कोरोनामधून बरे होणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ४ लाख ३९ हजार ९४७ हजार लोकं बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत देशभरातील १५ हजार ५१५ लोक कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील कोरोनाची रिकव्हरी रेट ६१ टक्क्यांहून अधिक आहे.

कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी देशात सातत्याने चाचणी होत आहे. सोमवारी देशभरात २.४१ लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशातील एकूण कोरोनाची चाचणी वाढून १.०२ कोटींवर गेली आहे. अमेरिका, रशिया आणि ब्रिटननंतर भारतात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.


Corona: ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -