घरCORONA UPDATECoronaVirus: लालू प्रसाद यादव यांची कोरोना चाचणी? हे ठरले प्रमुख कारण

CoronaVirus: लालू प्रसाद यादव यांची कोरोना चाचणी? हे ठरले प्रमुख कारण

Subscribe

रांचीतील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला लालू प्रसाद यादव यांचे तज्ज्ञ डॉ. उमेश प्रसाद यांच्या वॉर्डमधील एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यावरही कोरोनाचे संकट घोंघावत आहे. त्यांचीदेखील कोरोना चाचणी होण्याची दाट शक्यता आहे. रांचीतील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला लालू प्रसाद यादव यांचे तज्ज्ञ डॉ. उमेश प्रसाद यांच्या वॉर्डमधील एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने ही भीती व्यक्त केली जात आहे. रिम्स हॉस्पिटलमध्ये एका महिन्यापासून उपचार घेणाऱ्या वृद्धाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज समोर आला. त्यानंतर एकच खळबळ माजली. तसेच लालू प्रसाद यादव यांच्यासह इतरही रुग्णांची चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – पोलिसांवर बंदूक रोखणाऱ्या शाहरुखला वाटतेय कोरोनाची भीती; मागितला जामीन

- Advertisement -

काय आहे प्रकरण

चारा घोटाळ्यात अटकेत असलेले लालू प्रसाद यादव यांना १३ विविध आजारांनी ग्रासले आहे. ते क्रॉनिक किडनी या भंयकर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना मधुमेहाचाही वारंवार त्रास होत असतो. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा खतरा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यासंबंधीचा दाखल देत त्यांनी प्रशासनाकडे पॅरोलवर सोडण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. रांचीतील बिरसा मुंडा केंद्रीय कारागृह, होटवार येथील कारागृह अधिक्षक आणि महानिरीक्षक यांनीही लालू यांच्या तब्येतीच्या अनुशंगाने त्यांना रिम्स हॉस्पिटलमधील वेगळ्या वॉर्डमध्ये हलवण्याबाबतचे पत्र गृह मंत्री विभागाला पाठवले होते. आता त्या हॉस्पिटलमध्येच कोरोना रुग्ण आढळल्याने लालूंची चाचणी होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसून संबंधीत डॉक्टर जर क्वारंटाइन झाले तर लालूंचीही चाचणी केली जाईल, हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -