घरदेश-विदेशचंद्राच्या तुकड्यासाठी तब्बल १९ कोटींपासून लागतेय बोली

चंद्राच्या तुकड्यासाठी तब्बल १९ कोटींपासून लागतेय बोली

Subscribe

लंडनमध्ये चंद्राच्या तुकड्याची विक्री केली जाणार आहे. मात्र कोणत्या बाजारात नाही तर बोली लावून सर्वाधिक रक्कम देणाऱ्याला हा दुर्मिळ तुकडा मिळणार आहे. खगोल शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अंतराळात कोणत्या तरी अॅस्टेरॉयड किंवा धूमकेतुने चंद्राला टक्कर मारली असावी. त्यानंतर हा तुकडा अवकाशात स्वतंत्र झाला आणि आफ्रिकेच्या सहारा वाळवंटात पडला. चंद्राच्या या तुकड्याचे वजन साधारण १३.५ किलो असून त्याला विकत घेण्यासाठीची बोली ब्रिटनमधील क्रिस्टी संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी २.५ मिलियन डॉलर म्हणजेच साधारण १९ कोटी रुपयांपासून बोली लावण्यास सुरूवात केली जाईल.

- Advertisement -

या तुकड्याचे नाव NWA 12691 असून तो पृथ्वीवर आढळलेला चंद्राचा पाचवा सर्वात मोठा तुकडा आहे. आतापर्यंत पृथ्वीवर ६५० किलो चंद्राचे तुकडे आढळून आले असून आता NWA चाही यात समावेश झाला आहे. या तुकड्याचा आकार फुटबॉलसारखा असून क्रिस्टीचे शास्त्रज्ञ आणि अभ्यासक जेम्स हिसलोप यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चंद्राचा एक खराखुरा तुकडा आहे. हा माणसाच्या डोक्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा आहे. त्यामुळे हा खुपच दुर्मिळ आहे.

हेही वाचा –

या राज्यात दारु झाली महाग; ७० टक्के कोरोना टॅक्स आकारणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -