घरदेश-विदेशहिंदूसमोर गायींची कत्तले करणे गुन्हा आहे का? LLB च्या विद्यार्थ्यांना प्रश्न

हिंदूसमोर गायींची कत्तले करणे गुन्हा आहे का? LLB च्या विद्यार्थ्यांना प्रश्न

Subscribe

बुलंदशहर येथे झालेल्या घटनेमुळे देशात अस्थिरता असताना आता शिक्षण विभागाच्या एका प्रतापामुळे डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. गायींच्या हत्या रोखण्यासाठी हिंदू समाज आक्रमक झालेला असताना LLB च्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये हिंदूसमोर गायीची कत्तले करणे गुन्हा आहे का? असा प्रश्न विचारला आहे. दिल्लीच्या गुरु गोविंद इंद्रप्रस्थ विद्यापीठात हा सगळा प्रकार घडला असून हा सगळा प्रकार बिलाल अन्वर या वकिलाने समोर आणला आहे.

काय होता प्रश्न ?

Ahmed, a Muslim kills a cow in a market in the presence of Rohit, Tushar, Manav and Rahul, who are Hindus. Has Ahmed committed any offence?”
सदर प्रश्न हा LLB च्या पार्ट १ च्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. या प्रश्नात दोन्ही धर्मांमध्ये विनाकारण भांडण लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बिलाल अन्वर या सुप्रीम कोर्टातील वकिलांनी प्रश्नपत्रिकेचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन हा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

वाचा- बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अटकेत

विद्यापीठाने मागितली माफी

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नावरुन गदारोळ माजल्यानंतर विद्यापीठाने प्रश्नपत्रिकेतून हा प्रश्न काढून टाकला. शिवाय माफी मागत विचारलेल्या प्रश्नाचे गूण विद्यार्थ्यांना दिले जातील, असे देखील सांगितले.

- Advertisement -
वाचा- गोहत्येच्या संशयावरून उद्रेक, पोलिस निरिक्षकाचा मृत्यू

चौकशीचे आदेश

दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदीया यांनी हा प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारलाच कसा ? धार्मिक भावना दुखावण्याचे काम करण्याचा असा घाणेरडा प्रयत्न कोणी केला ? याची कसून चौकशी करणार असल्याचे देखील सिसोदीया म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -