घरमहाराष्ट्रविषारी गोळ्या खाल्याने विवाहितेचा मृत्यू

विषारी गोळ्या खाल्याने विवाहितेचा मृत्यू

Subscribe

विवाहितेने अज्ञात कारणावरून विषारी गोळ्या खाल्याने तिचा उपचारा दरम्यान मृत्यू

भिवंडीमध्ये विवाहितेने अज्ञात कारणावरून विषारी गोळ्या खाल्या. या विषारी गोळ्या खाल्याने या विवाहित महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान या विवाहित महिलेचा मृत्यू झाला. या महिलेने विषारी गोळ्या खाल्याने सोमवारी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचे नाव संगिता संदीप दुमाडा असून तिचे वय ३७ वर्ष असून पलाट पाडा येथे राहायला होती.

उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्य़ू

सदर महिलेने अज्ञात कारणावरून विषारी गोळ्या खाल्याने तिला प्रथम पारोळ येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला आहे.या मृत्यूची नोंद शांतीनगर पोलीस ठाण्यात करून पुढील तपास विरार पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -