घरदेश-विदेशLPG गॅस सिलेंडरचे दर सामान्यांच्या अवाक्याबाहेर; एकाच महिन्यात ३ वेळा दरवाढ

LPG गॅस सिलेंडरचे दर सामान्यांच्या अवाक्याबाहेर; एकाच महिन्यात ३ वेळा दरवाढ

Subscribe

जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने अधीच सर्वसामान्यांना फटका बसला आहे. यानंतर एका महिन्यात आणखी एक फटका सहन करावा लागणार आहे. कारण पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्याचे समोर आले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आज सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना आणखी एक धक्का दिला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. या महिन्यात तिसऱ्यांदा सिलेंडर महाग झाले आहे. तेल कंपन्या दरमहा एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेत असतात. प्रत्येक राज्यात असणाऱ्या वेगवेगळ्या करानुसार, एलपीजीची किंमत बदलत असते. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ केल्याने सामान्यांचे महिन्याचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे.

जाणून घ्या, तुमच्या शहरातील दर

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलेंडर पूर्वीपेक्षा २५ रुपयांनी महाग झाला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दिल्लीत ७९४ रुपये द्यावे लागणार आहे. तर यापूर्वी ग्राहकांना ७६९ रुपयांच्या किंमतीवर उपलब्ध होत होते. तर कोलकातामध्ये त्याची किंमत ७९५ रुपयांवरून वाढून ८२० रुपये झाली आहे. मुंबईत त्याची किंमत ७६९ रुपयांवरून ७९४ रुपयांवर आणि चेन्नईमध्ये ती किंमत ७८५ रुपयांवरून ८१० रुपयांवर गेली आहे.

- Advertisement -

यापूर्वी तेल कंपन्यांनी ४ फेब्रुवारीला सिलेंडरच्या किंमतीत २५ रुपये आणि १४ फेब्रुवारीला ५० रुपयांची वाढ केली होती. यानंतर पुन्हा २५ रुपयांनी महाग झाले आहेत. म्हणजेच एकाच महिन्यात १०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांत या किंमतीमध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०२० मध्ये एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी महागला होता तर जानेवारी २०२१ मध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

असे वाढले दर….

  • १ डिसेंबर रोजी दर ५९४ रुपयांवरून ६४४ रुपये प्रति सिलेंडर
  • १ जानेवारी रोजी दर ६४४ रुपयांवरून ६९४ रुपये प्रति सिलेंडर
  • ४ फेब्रुवारी रोजी दर ६९४ रुपयांवरून ७१९ रुपये प्रति सिलेंडर
  • १५ फेब्रुवारी रोजी दर ७१९ रुपयांवरून ७६९ रुपये प्रति सिलेंडर
  • २५ फेब्रुवारी रोजी दर ७६९ रुपयांवरून ७९४ रुपये प्रति सिलेंडर
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -