घरदेश-विदेशयूपीमध्ये माफियाराज : 64 कुख्यात गुंडांपैकी 39 तुरुंगात, पाच फरार आणि 20 जामिनावर

यूपीमध्ये माफियाराज : 64 कुख्यात गुंडांपैकी 39 तुरुंगात, पाच फरार आणि 20 जामिनावर

Subscribe

नवी दिल्ली : यूपी सरकारमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपद हाती घेतल्यानंतर माफिया आणि गुन्हेगारांवर झिरो टॉलरन्स अंतर्गत कारवाई करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सरकार आणि पोलिसांमध्ये कायदेशीर खेळ सुरू झाला आहे. यूपी राज्यातील लिस्टेड माफियांची यादी आता समोर आली आहे. या यादीनुसार 64 माफिया यूपीमध्ये कार्यरत आहेत.

आठवड्याभरापूर्वीच अतिक अहमद, त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली, तर अतिकच्या मुलाचा एन्काऊंटमध्ये मृत्यू झाला होता. असे असले तरी यूपीमध्ये अजूनही माफियाराज सुरू असल्याचे लिस्टेड माफियांची यादी समोर आल्यावर लक्षात येते. 64 माफियांचा यादीत समावेश असून यातील 39 तुरुंगात आहेत, तर आणखी पाच माफिया फरार असून पोलीस त्यांचा बऱ्याच दिवसांपासून शोध घेत आहेत. याशिवाय ब्रिजेश सिंगसह 20 माफिया जामिनावर बाहेर असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच, त्यांच्या प्रकरणांमध्ये पावले उचलत आहेत. मुख्तार अन्सारीसह 39 माफिया सध्या तुरुंगात आहेत. यामध्ये अजय शिपाहीने यापूर्वी आत्मसमर्पण केले होते, पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला आदित्य राणा उर्फ ​​रवी हा चकमकीत ठार झाला आहे.

- Advertisement -

फरार माफिया
पश्चिम उत्तर प्रदेशातील पोलिसांच्या यादीतील माफिया बदनसिंग उर्फ ​​बद्दो, सहारनपूरचे माजी आमदार हाजी इक्बाल उर्फ ​​बाला, गौतम बुद्ध नगरचे मनोज उर्फ ​​आसे, मेरठचे विनय त्यागी उर्फ ​​टिंकू, लखनौचे जुगनुवालिया उर्फ ​​हरविंदर आणि जोवाद उर्फ ​​पप्पु हे सर्व फरार असून पोलीस या सर्वांचा शोध घेत आहेत.

माफिया जामिनावर बाहेर
याशिवाय माफिया ब्रिजेशकुमार सिंग, सुशील उर्फ ​​मूच, विनोद शर्मा, एजाज, डब्बू सिंग उर्फ ​​प्रदीप सिंग, गुड्डू सिंग, अनूप सिंग, संजीव द्विवेदी, राकेश यादव, सुधीर कुमार सिंग, विनोद कुमार उपाध्याय, राजन तिवारी, सौद अख्तर, लल्लू. यादव, बच्चू यादव, राजेश यादव, गणेश यादव, कममू उर्फ ​​कमरूल हसन आणि जाबीर हुसेन हे जामिनावर बाहेर आहेत.

- Advertisement -

हे माफिया तुरुंगात
मुख्तार अन्सारी, उधम सिंग, यागेश भदौरा, हाजी याकूब कुरेशी, शारिक, सुनील राठी, धर्मेंद्र, यशपाल तोमर, अमर पाल उर्फ ​​कालू, अनुज बरखा, विक्रांत उर्फ ​​विकी, संजीव माहेश्वरी उर्फ ​​जीवा, अनिल चौधरी, ऋषी कुमार शर्मा, अनुपम दुबे, खान मुबारक यांच्यासह ३९ माफिया तुरुंगात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -