घरमहाराष्ट्रआता फक्त झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्यात; आव्हाडांचा भाजपला टोला

आता फक्त झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्यात; आव्हाडांचा भाजपला टोला

Subscribe

आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत, मुघल गेले, मौलाना आझाद गेले, महात्मा गांधी पुस्तकातून काढून टाकले आता उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा चार्ल्स डार्विन सुद्धा काढला. आता फक्त झाडाखाली शाळा घ्यायच्या राहिल्यात, असं ट्वीट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करत विधान केले आहे. आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत, मुघल गेले, मौलाना आझाद गेले, महात्मा गांधी पुस्तकातून काढून टाकले आता उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा चार्ल्स डार्विन सुद्धा काढला. आता फक्त झाडाखाली शाळा घ्यायच्या राहिल्यात, असं ट्वीट करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. (NCP leader Jitendra Awhad tweeted and criticised BJP Government on charles darwin theory of evolution removed from Science book)

युपीच्या सरकारने इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकला, तसंच, आता NCERT ने चार्ल्स डार्विन यांचा धडा काढून टाकला आहे. त्यामुळे ट्वीट करत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

आव्हाडांचं ट्वीट काय?

शालेय पुस्तकातून मुघल गेले, मौलाना आझाद गेले; महात्मा गांधी गेले आता शालेय अभ्यासक्रमातून मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा चार्ल्स डार्विन सुद्धा काढला. फक्त झाडाखाली शाळा बसवायच्या राहिल्यात, असं ट्वीट आव्हाडांनी केलं आहे.

- Advertisement -

CBSE च्या दहावीच्या विज्ञान अभ्यासक्रमातून जैविक उत्क्रांतीचा सिद्धांत वगळ्यात आला आहे. त्यामुळे आता यावर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) निर्णयावर 1,800 हून अधिक शास्त्रज्ञ, विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षकांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा चार्ल्स डार्विन याचा धडा काढून टाकण्यात आल्याने,  शास्त्रज्ञ, विज्ञान शिक्षक आणि इतर शिक्षकांनी यावर आक्षेप घेतला आहे.

भाजपचे नेते विनोद तावडे हे इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार होते असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर विनोद तावडे यांनी खुलासा केला होता. मुघलांचा इतिहास काढणं म्हणजे शिवाजी महाराजांचं शौर्य काढण्यासारखं नाही.

( हेही वाचा: आम्ही येथे आलो कारण जळगाव शिवसेनेचं आहे; गुलबराव पाटील यांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर )

योगी सरकारने मुघलांचा इतिहास काढून टाकला

योगी सरकारने मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढून टाकला आहे. १२वीच्या अभ्यासक्रमात मोठे बदल केले आहेत. यूपीमध्ये १२ वीच्या वर्गात शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे. याशिवाय इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून इस्लामचा उदय, संस्कृतींचा संघर्ष आणि औद्योगिक क्रांतीचे धडेही काढून टाकण्यात आले आहेत. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापासून हा बदल लागू करण्यात आला आहे. यासोबतच नागरिकशास्त्राच्या पुस्तकातून अमेरिकन वर्चस्व आणि शीतयुद्धाचा धडाही काढून टाकण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -