घरताज्या घडामोडीCabinet Reshuffle : जगनमोहन सरकारमध्ये मोठा फेरबदल, अनेक मंत्री देणार राजीनामा

Cabinet Reshuffle : जगनमोहन सरकारमध्ये मोठा फेरबदल, अनेक मंत्री देणार राजीनामा

Subscribe

आंध्र प्रदेश सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ९ ते ११ कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामा घेणार असल्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री राजीनामे देतील अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी आज राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची अंतिम यादी राज्यपालांना सादर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मंत्र्यांचा आजच राजीनामा येईल तर फक्त ४ मंत्री आपल्या पदावर कायम राहणार आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी एक दिवसपूर्वी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. राज्यात सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या स्थितीबाबत त्यांनी चर्चा केली. सध्याच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी 8 जून 2019 रोजी शपथ घेतली होती. जगनमोहन सरकारमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फेरबदल असेल.

- Advertisement -

मुख्यमंत्री जगनमोहन यांनी फेरबदलाचे दिलं होतं आश्वासन

आध्र प्रदेश मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी ३० मे २०१९ मध्ये मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर आश्वासन दिलं होते की, अडीच वर्षानंतर आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करतील त्यानुसार ते फेरबदल करत आहेत. तसेच यावेळी त्या आमदारांना संधी देण्यात येईल ज्या आमदारांना मंत्री पदाची संधी मिळाली नाही. मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी आपल्या मंत्र्यांचा राजीनामा मागतील आणि एक नवीन मंत्र्यांची टीम तयार करतील.

- Advertisement -

कोरोना संकटामुळे फेरबदल लांबवला

कोरोना संटकामुळे जगनमोहन रेड्डी सरकारचा फेरबदल लांबणीवर गेला आहे. ८ जून २०१९ मध्ये मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये २४ मंत्र्यांचा समावेश आहे. सगळ्या मंत्र्यांना ८ डिसेंबर २०२१ मध्ये अडीच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे फेरबदल लांबणीवर टाकला होता. अखेर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा : Kanjurmarg Car Shed : कांजूरमार्ग मेट्रो कारशेड वाद सामंजस्याने मिटवा, राजकारण आणू नका; हायकोर्टाचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -