घरमहाराष्ट्र...तर जरंडेश्वर साखर कारखाना 27 हजार शेतकऱ्यांना परत देणार, किरीट सोमय्यांचं आश्वासन

…तर जरंडेश्वर साखर कारखाना 27 हजार शेतकऱ्यांना परत देणार, किरीट सोमय्यांचं आश्वासन

Subscribe

अशा प्रकारानं जप्त झालेल्या प्रॉपर्टीसाठी 27 हजार शेतकऱ्यांकडून अर्ज आला किंवा त्यांनी ईडीला येऊन भेटले, तर आज ईडीनं सांगितलं की आमची हरकत नाही. कारण तो सहकारी साखर कारखाना आहे. हा कारखाना त्यांचे मूळ सभासद जर शेतकरी घेऊ इच्छितात, चालवू इच्छितात, तर आम्ही न्यायालयात ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी द्यायला तयार आहोत, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्यांनी जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांसोबत मी ईडी कार्यालयात भेट दिलीय. त्या भेटीनंतर जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी पद्धतीने अजित पवारांनी ताब्यात घेतला. तो त्या शेतकऱ्यांना परत करावा, अशी मागणी केलीय. अजित दादांना न्यायालयानं उत्तर दिलेलं आहे. ईडीनं काही महिन्यांपूर्वीच जप्ती केली आणि त्या जप्तीवर कोर्टानं शिक्कामोर्तब केलं. बेनामी होल्डर्स असल्यास अजितदादांनी बोलायची गरज काय आहे, असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केलाय. ईडीच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर बाहेर येत किरीट सोमय्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

अजितदादांचा काही संबंध नाही, तरी ते बोलतात कशाला?. पीएमएलए कायद्यात तरतूद आहे, जर अशा प्रकारानं जप्त झालेल्या प्रॉपर्टीसाठी 27 हजार शेतकऱ्यांकडून अर्ज आला किंवा त्यांनी ईडीला येऊन भेटले, तर आज ईडीनं सांगितलं की आमची हरकत नाही. कारण तो सहकारी साखर कारखाना आहे. हा कारखाना त्यांचे मूळ सभासद जर शेतकरी घेऊ इच्छितात, चालवू इच्छितात, तर आम्ही न्यायालयात ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी द्यायला तयार आहोत, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

- Advertisement -

यांनीसुद्धा त्यांना निवेदन दिलं आहे. आता हे लोक पीएमएलए कोर्टात अर्ज करणार आणि मग अर्जाची सुनावणी होणार, त्यावेळी ईडीनं सांगितलंय की आम्ही त्यासाठी संमती देऊ. अजित पवारांचा हा कारखाना नाही आहे. तर अजित पवार आणि शरद पवारांनी मूळ शेतकऱ्यांना कारखाना परत देण्यासाठी सहकार्य करावं. अजितदादांवर कारवाई हा वेगळा भाग आहे. जरंडेश्वर साखर कारखाना ते म्हणतात माझा नाही. ते उपमुख्यमंत्री आहेत. मूळ शेतकरी पुढे येत आहेत. कारखाना शेतकऱ्यांना परत देऊन एक आदर्श सर्वांनी उभा करावा. गुरू कमोडिटीचे मालक पवार कुटुंबीय आहे. त्यांच्या शेअर होल्डिंगच्या 17 कंपन्या आहेत. जे कागदावर आहे ते मी वाचून दाखवतो, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय.

विशेष म्हणजे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी किरीट सोमय्या आज जरंडेश्वर साखर कारखान्याचे निवडक सदस्यांसह ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी सोमय्यांना विक्रांतच्या निधीचं काय झालं? असा सवाल विचारण्यात आला. सोमय्यांना दोनदा हा प्रश्न विचारला असता त्यावर ते भडकले. मला विचारलंच नाही, डायरेक्ट एफआयआर दाखल केली. पोलिसांनी अटक करण्यासाठी हे सेक्शन लावलं, तर पोलिसांनी सांगावं 58 कोटी कुठून आले? मी नाही सांगणार. राऊतांनीच हा आकडा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर सांगितलं आहे, त्यांच्याकडे पुरावे असल्यास त्यांनी जनतेसमोर आणावेत, असंही किरीट सोमय्या म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचाः माझ्या घोटाळ्याचे कागद राऊतांनी जनतेसमोर ठेवावे, मी दमडीचाही घोटाळा केला नाही- किरीट सोमय्या

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -