घरदेश-विदेशट्रेड मार्क चोरीप्रकरणी 'मेक माय ट्रीप'ने केला गुन्हा दाखल

ट्रेड मार्क चोरीप्रकरणी ‘मेक माय ट्रीप’ने केला गुन्हा दाखल

Subscribe

कंपनी नावाचा वापर केल्यामुळे मेक माय ट्रिप कंपनीने दुसऱ्या कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार नोंदवली आहे.

गुगल हे आज जागातील सर्च इंजीनमधले मोठं नाव आहे. जगभरातील लोक इंटरनेटवर सर्च करण्यासाठी गुगलचा वापर करतात. गुगलच्या वाढत्या वापरामुळे गुगलवर जाहिरातींचे प्रमाण वाढले आहे. सामान घेण्यासाठी ऑनलाइन साइट्सचा वापर केला जातो. अशाच एक वेबसाईटवर प्रवासाची तिकीटे बुक केली जातात. ऑनलाइन टॅव्हल कंपनी ‘मेक माय ट्रिप’ने ‘ईजी माय ट्रिप’ कपंनी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीअंतर्गत ईजी माय ट्रिपने आपल्या नावाचा परवानगी शिवाय वापर केला असे म्हटलं आहे. गुगल सर्चमध्ये टॉपला येण्यासाठी या दुसऱ्या वेबसाईटने आपल्या नावाचा वापर केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सर्चमध्ये पहिला येण्यासाठी केलेत नावात बदल

‘मेक माय ट्रिप’ ही प्रवाशांना यात्रेवर जायचे असल्यास त्यांना ऑनलाइन बुकिंग करुन देण्याची सुवधा देणारी कंपनी आहे. गुगल सर्चवर मेक माय ट्रिप हे नाव सर्च केल्यास कंपनीची वेबसाइट सुरुवातीला दिसते. माय ट्रिप या नावाचा वापर करून गुगलसर्च मध्ये पहिला येण्याचा या कंपनीने प्रयत्न केला होता. आपल्या नावाचे कॉपीराईट्स असल्यामुळे मेक माय ट्रिपने नावाचा वापर केल्याबद्दल तक्रार केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -