घरताज्या घडामोडीईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जींचा पार्थ चॅटर्जींना झटका, मंत्रिमंडळातून डच्चू

ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जींचा पार्थ चॅटर्जींना झटका, मंत्रिमंडळातून डच्चू

Subscribe

बंगालमधील १०० कोटींच्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात राज्याचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांची कोंडी करण्यात आली आहे. पार्थ चॅटर्जी यांना पश्चिम बंगालच्या ममता सरकारकडून डच्चू देण्यात आला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पार्थ यांना मंत्रीपदावरून हटवले आहे. त्यांना तिन्ही मंत्रिपदावरून हटवण्यात आले आहे. अटक झाल्यानंतर सहा दिवसांनी ममता बॅनर्जी यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

ममता बॅनर्जी चटर्जी यांच्यासोबत उपस्थित असलेल्या उद्योग आणि इतर विभागांची जबाबदारी स्वीकारतील. तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पार्थ यांच्या राजीनाम्याबाबत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने ज्या पद्धतीने आवाज उठवण्यास सुरुवात केली त्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक घेतली.

- Advertisement -

मंत्रिमंडळ बैठकीनंतर घोषणा

मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ चॅटर्जी यांच्या मंत्रीपदाचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित झाला. विशेष म्हणजे पक्षाचे ज्येष्ठ नेतेच आहेत.

- Advertisement -

बळीचा बकरा बनवला – मजूमदार

बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी सांगितले की, पार्थ चॅटर्जी यांना बळीचा बकरा बनवण्यासाठी हटवण्यात आले आहे. भाजपची ताकद पाहून पार्थ चॅटर्जींना घाबरून बाहेर काढले. ५ वाजताच्या बैठकीमध्ये निर्णय घेणे अपेक्षित होते. अभिषेक बॅनर्जी हे श्रेय घेणार होते. परंतु लोकांच्या नाराजी लक्षात घेता पार्थ चॅटर्जींना बैठकीच्या आधीच धक्का देण्यात आला.

सीएम ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच चॅटर्जी यांना टाळले आहे. तिथेच, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष यांनी त्यांना मंत्रिमंडळासह सर्व पदांवरून हटवण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी, TMC सरचिटणीस कुणाल घोष यांनी आज ट्विट केले की, पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपदावरून आणि पक्षाच्या सर्व पदांवरून तत्काळ हटवावे. त्यांची हकालपट्टी करावी. पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपद आणि सर्व पक्षीय पदावरून तत्काळ हटवावे. त्यांची हकालपट्टी करावी. पार्थ चॅटर्जी यांना मंत्रीपद आणि सर्व पक्षीय पदावरून तत्काळ हटवावे. त्यांची हकालपट्टी करावी.


हेही वाचा : ‘माझ्याशी बोलू नका’,म्हणत संसदेत सोनिया गांधी स्मृती इराणी यांच्यात खडाजंगी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -