Receipe : आजचं ट्राय करा पौष्टिक आणि चटपटीत सोया टिक्की

तुम्ही आत्तापर्यंत आलू टिक्की, पनीर टिक्कीचा आस्वाद घेतला असेल, या वेळी तुम्ही पौष्टिक अश्या सोया टिक्कीचा आस्वाद नक्की घेऊन बघा.

सोया टिक्की साहित्य :

 • १/२ किलो बटाटा (उकडलेला)
 • १ लहान कप वाटाणे (उकडून मॅश केलेले)
 • १ कप सोया तुकडे
 • ५-६ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा आलं-लसूण पेस्ट
 • १ चमचा हळद
 • १ चमचा गरम मसाला
 • कोथिंबीर
 • तेल आवश्यकतेनुसार
 • मीठ चवीनुसार

कृती :

 • सर्वप्रथम सोयाचे तुकडे १० मिनिट गरम पाण्यात उकळून घ्या आणि त्यानंतर सोया पिळून घ्या.
 • आता एका भांड्यात सोया मॅश करा.
 • दुसरीकडे एका भांड्यात उकडलेला बटाटा मॅश करा. त्यामध्ये वाटाणे (मॅश केलेले), हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, गरम मसाला आणि मॅश केलेला सोया एकत्र करून घ्या.
 • आता तळाहातावर तेल लावून या मिश्रणाचे गोळे करून त्याला टिक्कीचा आकार द्या.
 • आता कढई तेल ओता, तेल गरम होताच त्यामध्ये ही टिक्की लालसर होईपर्यंत तळून घ्या.
 • आता एका प्लेटमध्ये काढून सॉससोबत सर्वांना सर्व्ह करा.

हेही वाचा :Receipe : अगदी सोप्या पद्धतीने बनवा नारळी बर्फी