घरदेश-विदेशबंदुकीचा धाक दाखवून, लुटले मानवी रक्त!

बंदुकीचा धाक दाखवून, लुटले मानवी रक्त!

Subscribe

पोलीस सध्या हे अजब काम करणाऱ्या तरुणाचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे.

सहसा चाकू किंवा बंदुकीचा धाक दाखवून पैसे, महागड्या वस्तू किंवा दागिने लुटल्याची प्रकरणं आपल्यासमोर येतात. मात्र, झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरामध्ये नुकतीच एक अनोखी घटना घडल्याचं समोर आलं आहे. रांचीमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून चक्क एक पिशवी रक्त लुटल्याची गजब घटना समोर आली आहे. याआधी अशाप्रकारची घटना कुणी क्वचितच ऐकली असेल. शहरातील ‘रांची सदर हॉस्पिटल’ मधील ब्लड बँकमध्ये गुरुवारी दुपारच्यावेळी ही अजब घटना घडली. एक तरुण दुपारच्या वेळी अचानक हॉस्पिटलमध्ये घुसला. त्यावेळी त्याने आपला चेहरा मास्कने झाकला होता. सदर तरुणाने नातेवाईकासाठी एक पिशवी रक्‍त मागितले. त्यावेळी तेथील कर्मचार्‍यांनी त्याला रक्‍त घेण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण करायला सांगितलं. मात्र, तरुणाने त्यासाठी नकार दिला.


खुशखबर : Jio च्या ग्राहकांना 2 GB फ्री डेटा

यावरुन हॉस्पिटलचे अधिकारी आणि त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंर अचानक त्या तरूणाने ब्लड बँक कर्मचारी गोपाल ठाकूर याच्यावर पिस्तुल ताणली. पिस्तुलच्याच धाकावर त्याने फ्रिझरमध्ये ठेवलेली रक्ताची एक पिशवी घेतली आणि हॉस्पिटलबाहेर निघू गेला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रक्‍त लुटणारा तरुण जवळच्याच गावचा रहिवासी असल्याचा पोलिसांनी काहीवेळातच छडा लावला. मात्र, तो तरूण त्या गावात पोहचण्याआधीच तरूण तिथे नसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. दरम्यान, पोलीस सध्या या तरुणाचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -