घरCORONA UPDATECoronavirus: शारीरिक अंतर राखण्यासाठी त्याने बनवली इलेक्ट्रिक बाईक

Coronavirus: शारीरिक अंतर राखण्यासाठी त्याने बनवली इलेक्ट्रिक बाईक

Subscribe

नव्या बाईकचं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनीही कौतुक केलं आहे.

त्रिपुरा राज्याची राजधानी आगरताळा येथे एका व्यक्तीने इलेक्ट्रिक मोटरसायकल बनवली आहे जी कोरोनो विषाणूच्या साथीच्या वेळी ड्रायव्हर आणि सोबतच्या व्यक्तीमध्ये एक मीटर अंतर ठेवते. पार्थ शहा असं या व्यक्तीचं नाव आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही या अनोख्या मॉडेलबद्दल पार्थ शहाचं कौतूक केलं आहे. ३९ वर्षीय पार्थ शहाचं शालेय शिक्षण पूर्ण नाही. व्यवसायाने तो टीव्ही दुरुस्ती दुकानात काम करतो. पण त्याने कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी स्वत: चा बचाव करण्यासाठी घरी एक अनोखी मोटरसायकल तयार केली आहे.

शहाने स्क्रॅप डीलरकडून एक जुनी बाईक विकत घेतली आणि इंजिन काढून त्याची दोन भागात विभागणी केली. त्यानंतर चाकं जोडण्यासाठी त्याने एक मीटर लांब रॉड वापरली. आगरताळा येथील वृत्तसंस्थेशी बोलताना शहा म्हणाला, “आता मी माझ्या आठ वर्षांच्या मुलीबरोबर सुरक्षित अंतर ठेवत या दुचाकीवरून कुठेही जाऊ शकतो.” इतर देशांप्रमाणेच देखील देशभरात लॉकडाऊन आहे आणि कोरोनो विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना शारीरिक अंतर राखण्याचे आवाहन सरकारनं केलं आहे.

- Advertisement -

bike


हेही वाचा – रिलायन्स करणार कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात; मुकेश अंबानींचा मोठा निर्णय

- Advertisement -

बाईक तयार करण्यासाठी त्याने साठवलेल्या पैशांचा उपयोग केला. लॉकडाऊन संपल्यानंतर ते त्यांच्या मुलीला शाळेत आणण्यासाठी आणि सोडण्यासाठी ही बाईक वापरण्याचा विचार करत आहेत. शहा म्हणाले, “मुलाने स्कूल बसने यावे किंवा जावे अशी माझी इच्छा नव्हती कारण बसमध्ये गर्दी होईल.”

नवीन बाइक बॅटरीवर चालते आणि कमाल वेग ४० किमी/ताशी आहे. शहा म्हणाले की बॅटरी चार्ज होण्यास तीन तास लागतात, ज्यामुळे बाईक ८० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल. एकदा चार्ज करण्यासाठी साधारणत: दहा रुपये खर्च येतो. शहांच्या नव्या बाईकचं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनीही कौतुक केलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -