घरदेश-विदेशधक्कादायक! इंदौरमध्ये पतीचं कोरोनानं निधन; चीनमधून पत्नीनं व्हिडिओ कॉलवरून घेतले अंतिमदर्शन

धक्कादायक! इंदौरमध्ये पतीचं कोरोनानं निधन; चीनमधून पत्नीनं व्हिडिओ कॉलवरून घेतले अंतिमदर्शन

Subscribe

मध्य प्रदेशातील इंदौरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंदौरमध्ये एका व्यक्तीचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो गेल्या १२ दिवसांपासून कोरोनाशी लढा देत होता. मात्र हा लढा अयस्वी ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती चीनमधील एका बॅंकेत नोकरीस होता. दरम्यान, त्याच्या वडिलांचाही मृत्यू कोरोनामुळे झाला होता.

असा घडला प्रकार

इंदौरमध्ये कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मनोज शर्मा आहे. तो मध्य प्रदेशच्या सिवनी बालाघाटमध्ये राहणारा होता. तो चीनमध्ये शेन झेनमध्ये बॅंकेत नोकरी करण्यास होता. तीन महिन्यांआधीच तो पत्नी आणि मुलांना घेऊन भारतात आला होता. यावेळी त्याच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे त्याला कळाले. त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे आईला सांभाळण्याासाठी मनोज तेथेच थांबला होता. परंतु त्याने पत्नी आणि मुलांना चीनला परत पाठवले होते. अशा परिस्थितीत मनोजलाही कोरोनाचा संसर्ग झाला. त्याची तब्येत अचानक खूप खालवली आणि त्याला इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सलग १२ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र १२ दिवसांच्या लढ्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

अशा परिस्थितीत चीनमध्ये त्याच्या पत्नीला पतीच्या मृत्यूची बातमी समजली, मात्र वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे मनोजचा मृतदेह चीनला पाठवणं शक्य नव्हतं ना ती भारतात येऊ शकत होती, अशा परिस्थितीत मनोजच्या पत्नीने पतीच्या एका मित्राला अंत्यसंस्कारासाठी फोन केला. दरम्यान, मृत मनोजच्या मित्राने इंदुरमधील समाजसेवी संस्थांना संपर्क केला. यानंतर मनोजच्या मित्राने सर्व माहिती प्रशासनाला दिली.  त्यांनी लगेच नियमानुसार मनोजच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या पत्नीने व्हिडिओ कॉलवरून पतीचा अंत्यसंस्कार पाहिले आणि अंतिमदर्शन घेतले.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -