घरदेश-विदेश40 पैशांसाठी ग्राहक रेस्टॉरंटविरोधात पोहोचला कोर्टात; कोर्टाने ग्राहकालाच ठोठावला दंड

40 पैशांसाठी ग्राहक रेस्टॉरंटविरोधात पोहोचला कोर्टात; कोर्टाने ग्राहकालाच ठोठावला दंड

Subscribe

बंगळुरूमधील एका रेस्टॉरंटमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने रेस्टॉरंटने मालकाने त्याच्याकडून 40 पैसे जास्त घेतल्याने न्यायालयाच रेस्टॉरंटविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गेल्या 8 महिन्यांपासून सुनावणी सुरु आहे. शेवटी न्यायालयाने याचिकाकर्त्यावर न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याचा ठपका ठेवत दंड ठोठावला. तक्रारदाराने अनावश्यक प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा खटला दाखल केल्याने न्यायालयाचा किमती वेळ वाया गेला, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाने रेस्टॉरंटला चार हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

रिपोर्ट्सनुसार, प्रकरण 2021 सालचे आहे, जेव्हा मूर्ती नावाच्या व्यक्तीने बंगळुरूमधील अंपायर रेस्टॉरंटमध्ये जेवण ऑर्डर केले होते. जेवल्यानंतर त्यांना रेस्टॉरंटकडून 265 रुपयांचे बिल देण्यात आले. मात्र जेवणाचे बिल 264.60 रुपये झाले होते. यावेळी बिलासंदर्भात मूर्ती यांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी यावर नाराजी व्यक्त करत रेस्टॉरंटवर ग्राहकांची लूट केल्याचा आरोप केला. मूर्ती इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी या रेस्टॉरंटविरुद्ध ग्राहक न्यायालयात खटला दाखल करून 50 लाख रुपयांचे नुकसान भरपाई मागितली.

- Advertisement -

कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले

या घटनेमुळे आपण खूप व्यथित झालो असून आपल्याला धक्का बसल्याचे मूर्ती यांनी आपल्या याचिकेत लिहिले आहे. मूर्ती यांनी स्वतःची बाजू मांडली. रेस्टॉरंटच्या वतीने वकिलांनी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा 2017 च्या कलम 170 साठी युक्तिवाद केला. 8 महिने चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल देताना मूर्ती यांना फटकारले.

न्यायालयाने दंड ठोठावला

न्यायालयाने म्हटले की, भारत सरकारच्या नियमांनुसार 50 पैशांपेक्षा कमी पैसे दुर्लक्षित केले जाऊ शकतात आणि त्यापेक्षा जास्त, तो एक रुपया केला जाऊ शकतो. कोर्टाचा वेळ वाया घालवल्याबद्दल कोर्टाने मूर्ती यांना फटकारले आणि दंडही ठोठावला.


Holi 2022 : रंगपंचमीला तुमच्या राशीनुसार वापरा ‘हे’ रंग; वाढेल यश, मिळेल किर्ती


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -