घरताज्या घडामोडीपत्नीशी भांडण झाले म्हणून, नवरा घराबाहेर पडला आणि...

पत्नीशी भांडण झाले म्हणून, नवरा घराबाहेर पडला आणि…

Subscribe

बायकोशी भांडण झाल्यामुळे नवऱ्याने आपला राग एका वेगळ्या पद्धतीने शांत केल्याची घटना इटलीमध्ये घडली आहे.

माणसाचे भांडण झाले की, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करत असते. कोणी शांत राहत तर कोणी गाणी ऐकत बसत. पण, इटलीमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे. बायकोशी भांडण झाल्यानंतर नवऱ्याने एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आपला राग शांत केला आहे. ते वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

नेमके काय झाले?

इटलीतील कोमो येथे राहणाऱ्या एका जोडप्यामध्ये कौटुंबिक वाद झाला. हा वाद इतका भयंकर होता की, त्या नवऱ्याला आपला राग कसा शांत करावा?, असा प्रश्न पडला, म्हणून तो घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर हा व्यक्ती घरी परतलाच नाही, म्हणून बायकोने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर ही व्यक्ती तब्बल सात दिवसांनी घरी परतली.

- Advertisement -

हा व्यक्ती गेलेला तरी कुठे?

बायकोच्या रागाने घराबाहेर पडलेला नवरा राग शांत करण्यासाठी तब्बल ४५० किलोमीटर चालत निघाला. रागात असल्यामुळे तो इतका दूर कसा आला हे त्याला देखील जाणवले नाही. गिमारा शहरातील समुद्रकिनाऱ्याजवळ पोलिसांच्या गाडीने पॅट्रोलिंग करताना त्याला पाहिलं आणि चौकशी केली. दरम्यान, या व्यक्तीने घराबाहेर पडनाताना आपल्या सोबत कोणतेही सामान किंवा कसलीही सोय केली नव्हती. रात्र झाल्यानंतर तो विश्रांतीकरता रस्त्याच्या कडेला आराम करायचा आणि सकाळ झाल्यानंतर पुन्हा चालायला सुरुवात करायचा. तसेच आजूबाजूच्या व्यक्तींकडून जेवण मागून पोट भरायचा, असे त्यांनी सहा दिवस काढले. तसेच कोमा शहरातून सुमारे ४५० किलोमीटर अंतरावर गिमारा शहरात चालत आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले

- Advertisement -

दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे इटलीमध्ये रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्याच दरम्यान, पोलिसांना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती रस्त्याच्याकडेला दिसली. त्या व्यक्तीकडे विचारणा केली असता, ‘मी गेल्या आठ दिवसांपासून चालत असून आतापर्यंत मी ४५० किलोमीटर चालो आहे. मला माझ्या बायकोचा राग आला असून राग शांत करण्यासाठी मी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार कळताच पोलिसांना देखील आश्चर्य वाटले. पोलिसांनी याबाबत त्याच्या पत्नीशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. तसेच या व्यक्तींनी कर्फ्यूच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्याला तब्बल ३५ हजाराचा दंड भरावा लागला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


हेही वाचा – सावधान! ७० लाख भारतीयांच्या डेबिट, क्रेडिट कार्डच्या माहितीसह ईमेल-आयडी लीक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -