घरदेश-विदेशसुप्रसिद्ध दिवाळखोरीतील MDH मसाले कंपनी विकणार का? प्रवर्तकाने स्पष्टच सांगितलं

सुप्रसिद्ध दिवाळखोरीतील MDH मसाले कंपनी विकणार का? प्रवर्तकाने स्पष्टच सांगितलं

Subscribe

भारतातील मसाल्यांचा राजा म्हटली जाणारी एमडीएच कंपनी अडचणीत सापडल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे एमडीएच कंपनी लवकरच हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या ताब्यात जाणार असल्याचेही सांगितले जातेय. यामुळे कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांनी घटले आहेत. मात्र MDH मसाले कंपनीच्या विक्रीच्या वृत्ताचे खुद्द कंपनीने खंडन केले आहे. MDH कंपनी विकणार नसल्याचे कंपनीच्या प्रवर्तकाने जाहीर केले आहे.

एमडीएचने ट्विट करत या बातम्या निराधार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, अशा बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अफवांकडे लक्ष देऊ नये. असे आवाहन कंपनीने केले आहे. MDH चे चेअरमन राजीव गुलाटी म्हणाले की, MDH Pvt Ltd हा एक वारसा आहे जो श्रीमती चिमी लाल जी आणि श्रीमती धर्मपाल जी यांनी आयुष्यभर पुढे चालवला. आणि आता हा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही मनापासून कटिबद्ध आहोत.

- Advertisement -

दरम्यान FMCG कंपनी HUL बाजारात लक्स, लाइफबॉय, सर्फ एक्सेल, रिन, व्हील, पॉन्ड्ससारखे लोकप्रिय देशांतर्गत ब्रँड विकत आहे. मात्र त्यांनीही या बातमीवर भाष्य करण्यास नकार दिला. या अफवेवर आम्ही काहीही बोलणार नसल्याचे HUL च्या प्रवर्तकाने सांगितले आहे.

मसाल्याच्या बाजारात बड्या कंपन्यांची एन्ट्री

अलीकडे FMCG चे इतर प्रमुख ब्रँड्स जसे की ITC आणि Tata Consumer मसाल्यांच्या व्यवसायात त्यांची पोहोच वाढवत आहेत. त्यामुळे मसाल्यांच्या बाजार पेठेत आता बड्या कंपन्यांनी एन्ट्री घेतली आहे. कारण या व्यवसायात मार्जिन खूप चांगले आहे. त्यामुळे 2020 मध्ये ITC ने पूर्व भारतातील मसाल्यांच्या बाजारपेठेतील प्रमुख कंपनी Sunrise Foods ताब्यात घेतली. ITC ने ही कंपनी 2,150 कोटी रुपयांना विकत घेतली.

- Advertisement -

धरमपाल जी यांचे डिसेंबर २०२० मध्ये झाले निधन

एमडीएच मसाले कंपनीचे मालक धरमपाल गुलाटी यांचे डिसेंबर २०२० मध्ये निधन झाले. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानातील सियालकोट येथून कौटुंबिक मसाल्यांचा व्यवसाय भारतात आणला होता. हा व्यवसाय त्यांनी एक हजार कोटींहून अधिकचा अंपायर बनवला होता. त्यांच्यानंतर हा व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपवण्यात आला. MDH मध्ये 60 पेक्षा जास्त उत्पादनांची श्रेणी आहे. त्याचे मसालेही अनेक देशांमध्ये निर्यात केले जातात.


राज्यात अवैध गर्भलिंग तपासणी रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत?; पटोलेंच्या प्रश्नावर टोपेंनी दिले उत्तर


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -