घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटसौदी अरेबियात मरण पावलेल्या भारतीयांच्या अंत्यसंस्कारासाठी माणसं नाहीत!

सौदी अरेबियात मरण पावलेल्या भारतीयांच्या अंत्यसंस्कारासाठी माणसं नाहीत!

Subscribe

सौदी अरेबियासारख्या खाडी देशात लाखो विदेशी नागरिक नोकरी करतात.

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतापेक्षा परदेशात मृत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सौदी आरेबीया सारख्या देशात अतिशय हृदयद्रावक दृश्य बघायला मिळत आहेत. कोरोना व्हायरच्या भीतीमुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या अंतीम संस्काराला कोणी मित्र किंवा नातेवाईकही येत नाहीयेत. सगळ्यात वाईट तर सौदे अरेबियात असणाऱ्या परदेशी नागरिकांची शेवटच्या क्षणी त्यांचे नातेवाईक त्यांना बघूही शकत नाहीये. सौदी अरेबियात नुकताच असाच एक प्रकार घडला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका मजूराचे शव एक तास अँम्ब्यूलन्समध्येच पडून होता. शेवटी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनाच त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले.

सौदी अरेबियासारख्या खाडी देशात लाखो विदेशी नागरिक नोकरी करतात. देशातील हॉस्पिटल, बँका, कारखाने, यामध्ये काम करतात. मात्र कोरोना व्हायरसने या देशावर मोठं संकट आलं आहे. या महामारीमुळे सध्या कोणालाच शव घरात ठेवता येत नाहीये. मृतावर अंतीम संस्कार त्याच देशात करावे लागतात.

- Advertisement -

याविषयी बोलताना दुबई येथील हिंदू शवगृहाचे ईश्वर कुमार म्हणाले की, पूर्ण विश्व बदलत आहे. मृत रूग्णाबरोबर आता कोणीही नातेवाईक येत नाही, त्याला कोणीही स्पर्श करत नाही. कोणीही अंतीम संस्कारालाही येत नाही. या आधी २०० ते २५० लोक अंतीम संस्काराला यायचे. आता परिस्थीतीमुळे मृत रूग्णाबरोबर कोणीही येत नाही.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत १६६ लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर २६, ६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये भारतीय, पाकिस्तानी, नेपाळ, बांग्लादेशी, नागरिकांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊनचा किस्सा..लग्न न करताच नवरी आली सासरी!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -