घरदेश-विदेश... तर भाजपचे सरकार जाईल; मोदींच्या भावानेच दिला इशारा

… तर भाजपचे सरकार जाईल; मोदींच्या भावानेच दिला इशारा

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विर्दभ व मराठाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांंच्या जिल्यांसाठी स्वस्त दरात अन्नधान्य योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात गव्हु व तांदळाचे वाटप सुरु झाले. १४ जिल्ह्यातील सुमारे ३९ लाख जणांना याचा लाभ मिळाला. बुलढाण्यातील तीन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र ही योजना १ जुलै २०२२ रोजी बंद करण्यात आली. आधी गहू व नंतर तांदळचे वाटप बंद करण्यात आले.

बुलढाणा : जर माझ्या पाच लाख दुकानदारांचा व कर्मचाऱ्यांचा विश्वास गमावून बसलात तर देशात भाजपचे सरकार राहणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विर्दभ व मराठाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांंच्या जिल्यांसाठी स्वस्त दरात अन्नधान्य योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात गव्हु व तांदळाचे वाटप सुरु झाले. १४ जिल्ह्यातील सुमारे ३९ लाख जणांना याचा लाभ मिळाला. बुलढाण्यातील तीन लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र ही योजना १ जुलै २०२२ रोजी बंद करण्यात आली. आधी गहू व नंतर तांदळचे वाटप बंद करण्यात आले.

- Advertisement -

याविरोधात रेशन बचाव समिती, महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शेतकरी लाभार्थ्यांना सोबत घेऊन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रल्हाद मोदी यानी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

ते म्हणाले, केंद्र सरकारने आपले धोरण बदलायला हवे. अन्यथा आम्ही तुम्हाला बदलु. शिधा घेणाऱ्या महिलांना आम्ही सांगू की यांच्यावर विश्वास ठेवू नका. असे झाल्यास सरकारवर कोणाचाच विश्वास राहणार नाही. २०२४ येत आहे. तेव्हा मतदान आहे, हे विसरु नका.

- Advertisement -

सबका साथ सबका विश्वास हे ब्रिदवाक्य भाजप स्वत:च खोटं ठरवत आहे. भाजपचा निर्णय हा दोन लाख स्वस्त धान्य दुकानदारांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. असे झाले तर केंद्र सरकारवर जनतेचा विश्वास राहणार नाही. केंद्रातील सत्ता राहणार नाही, असा इशारा प्रल्हाद मोदी यांनी दिला.

मोदी सरकारच्या कामांचे जसे कौतुक होत आहे, तसेच त्यांच्या काही कामांवर टीकाही होत असते. प्रल्हाद मोदी हे सुरुवातीपासूनच मोदी सरकारवर टीका करत आहे. त्यांची कार्यपद्धती कशी चुकीची आहे हे प्रल्हाद मोदी सांगत असतात. आता तर त्यांनी मोदी सरकारच पडले, असा इशारा दिला आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -