घरदेश-विदेशमोदीजी बुलेट ट्रेन नको; भाजप नेत्याचा घरचा आहेर

मोदीजी बुलेट ट्रेन नको; भाजप नेत्याचा घरचा आहेर

Subscribe

'मेहेरबानी करा आणि देशातील ट्रेनची अवस्था सुधारा. बुलेट ट्रेनचं नंतर पाहा' अशा शब्दात भाजप नेत्यानं भाजपला घरचा आहेर दिला आहे.

बुलेट ट्रेनवरून महाराष्ट्रातून विरोधाचा सूर ऐकायला मिळत असताना आता भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. ‘मोदीजी अगोदर देशातील ट्रेनची परिस्थिती सुधारा, त्यानंतर बुलेट ट्रेनचा विचार करा’ अशा शब्दात पंजाबमधील भाजप नेत्या लक्ष्मी कांत चावला यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यांचा एक व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘मेहेरबानी करा आणि देशातील ट्रेनची अवस्था सुधारा. बुलेट ट्रेनचं नंतर पाहा’ असं लक्ष्मी कांत चावला यांनी म्हटलं आहे. लक्ष्मी कांत चावला यांनी पंजाबमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी देखील सांभाळलेली आहे. २२ डिसेंबर रोजी त्या शरयू – युमना ट्रेननं एसी डब्ब्यातून प्रवास करत होत्या. त्यावेळी ट्रेन तब्बल १० तास उशिरा धावत होती. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी व्हिडीओमध्ये रेकॉर्ड केला आहे.

वाचा – बुलेट ट्रेन प्रकल्पाला कायम विरोधच

भाजप नेत्याचा बुलेट ट्रेनला विरोध का?

पंजाबच्या माजी मंत्री लक्ष्मी कांत चावला २ डिसेंबर रोजी शरयू – युमना ट्रेननं एसी डब्ब्यातून प्रवास करत होत्या. त्यावेळी ट्रेन तब्बल १० तास उशिरानं धावत होती. पण, रेल्वेतील प्रवाशांना त्याबद्दल कोणतीही कल्पना दिली गेली नाही. शिवाय, रेल्वेचा मार्ग देखील बदलला गेला. या काळात प्रवाशांना ना खाण्याबद्दल विचारलं गेलं, ना पिण्याबद्दल. लोक फुटपाथवरती थांबूव ट्रेनची वाट पाहत आहेत. वेटींग रूमची देखील व्यवस्था नाही. त्याशिवाय स्थानकांची अवस्था देखील दयनीय अशी आहे. रेल्वे प्रवाशांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होत नाहीत आणि अशा वेळी आपण बुलेट ट्रेनला प्राधान्य देतो? असा सवाल यावेळी त्यांनी केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

वाचा – बुलेट ट्रेनची डेडलाईन डेड? भूसंपादनाच्या अडचणीत वाढ

मनसेचा देखील बुलेट ट्रेनला विरोध

दरम्यान, बुलेट ट्रेनची एक विट देखील महाराष्ट्रामध्ये रचू देणार नाही असा इशारा मनसेनं दिला आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरातमधील शेतकऱ्यांनी देखील बुलेट ट्रेनसाठी शेत जमिनी देण्यास नकार दिला आहे. मुंबईतील लोकल प्रवाशांमध्ये देखील बुलेट ट्रेनबाबत नाराजी दिसून येत आहे.

वाचा – वसई-विरार महापालिकेचा बुलेट ट्रेनला विरोध

वाचा – बुलेट ट्रेनला गुजरातच्या शेतकऱ्यांचाही विरोध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -