Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश लाल चौक आणि अतिरेक्यांचे आव्हान...; मोदींनी सांगितला तो किस्सा

लाल चौक आणि अतिरेक्यांचे आव्हान…; मोदींनी सांगितला तो किस्सा

Subscribe

पंतप्रधान मोदी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काश्मिर येथे अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता. कोणात हिम्मत असेल तर त्यांनी लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवावा, असे आव्हान अतिरेक्यांनी केले होते. तसे पोस्टरही अतिरेक्यांनी काश्मिरमध्ये लावले होते. त्यावेळी मी २३ जानेवारीला घोषणा केली की, मी कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेविना व बुलेट प्रुफ जॅकेट शिवाय २६ जानेवारीला सकाळी ११ वाजता  लाल चौकात तिरंगा फडकवेन. मी सांगित्याप्रमाणे तिरंगा फडकवला.

 

नवी दिल्लीः कोणत्याही सुरक्षेविना तसेच बुलेटप्रूफ जॅकेट शिवाय मी लाल चौकात तिरंगा फडकवला आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांचे नाव घेता हाणला.

- Advertisement -

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषण केले. या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचाही पंतप्रधान मोदी यांनी समाचार घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काही वर्षांपूर्वी काश्मिर येथे अतिरेक्यांनी धुमाकूळ घातला होता. कोणात हिम्मत असेल तर त्यांनी लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवावा, असे आव्हान अतिरेक्यांनी केले होते. तसे पोस्टरही अतिरेक्यांनी काश्मिरमध्ये लावले होते. त्यावेळी मी २३ जानेवारीला घोषणा केली की, मी कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेविना व बुलेट प्रुफ जॅकेट शिवाय २६ जानेवारीला सकाळी ११ वाजता लाल चौकात तिरंगा फडकवेन. मी सांगितल्याप्रमाणे तिरंगा फडकवला.

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, मी तिरंगा फडकवल्यानंतर मला प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला की तिरंगा फडकवल्यानंतर तोफांची सलामी दिली जाते. लाल चौकात मात्र तशी सलामी दिली गेली नाही. त्यावर मी म्हणालो की यावेळेस आपले वैरी बॉम्ब फोडून, गोळ्या चालवून तिरंग्याला सलामी देत आहे. आज जम्मू-काश्मिरमध्ये शांतता आहे. काश्मिरमध्ये पर्यटनासाठी भयमुक्त जाता येते. तेथे लोकशाही नांदत आहे. तेथे आता अभिमानाने तिरंगा फडकवला जात आहे.

- Advertisement -

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोलही सुनावले. सध्या देशात अनेक महत्त्वपूर्ण व गौरवशाली घटना घडत आहेत. त्या घटनांचा आनंद आपण सर्वांनी साजरा करायला हवा, असा सल्लाही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना दिला. २००४ ते २०१४ या काँग्रेसच्या दहा वर्षांच्या काळात काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत दहशतीचे वातावरण होते. संपूर्ण देशात हिंसाचार पसरला होता. तसेच काँग्रेसच्या काळात देशात दहशतवाद आणि हिंसाचारही वाढल्याचा हल्लाबोलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.

- Advertisment -