घरदेश-विदेशपंतप्रधानांनी केले १०० रुपयांचे नाण्याचे अनावरण

पंतप्रधानांनी केले १०० रुपयांचे नाण्याचे अनावरण

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जन्म दिनाच्या निमित्तावर १०० रुपयाच्या नाण्याचे अनावरण केले आहे. वाजपेयी यांची आज ९४ जयंती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका नवीन चलनाचे अनावरण केले आहे. १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या जन्म दिनाच्या निमित्तावर या नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. या नाण्यावर अटल बिहारी वाजपेयींचे चित्र कोरले आहे. संसदेतील एनेक्सी भवन येथे हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या नाण्याचे वजन ३५ ग्राम आहे. वाजपेयींचे नाव देवनागरी मध्ये लिहिलेआहे. फोटो खाली त्यांचे जन्म वर्ष आणि मृत्यू वर्ष लिहिली आहे.


माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे निधन १६ ऑगस्ट रोजी झाला होता. ते ९३ वर्षाचे होते अटलजी तीन वेळा देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यांना आदरांजली देण्यासाठी अनेक जागांची नावे त्यांच्या नावावर ठेवण्यात आली. हिमाचल प्रदेश येथील चार डोकरांचे नाव त्यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. उत्तराखंड येथील देहरादून विमानतळाचे नाव बदलूनही त्यांच्या नावावर ठेवण्यात आले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -