घरदेश-विदेशवाढत्या लोकसंख्येवर मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले...

वाढत्या लोकसंख्येवर मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले…

Subscribe

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापना दिवसानिमित्त मोहन भागवत यांनी नागपूर येथे महत्त्वाचं विधान केलं आहे. लोकसंख्या देशासाठी भार आहे. पण या लोकसंख्येचा वापरही करता येऊ शकतो. तसंच, मोहन भागवत यांनी लोकसंख्येसाठी एक नवी योजनाही बनवली आहे, ज्याचा परिणाम ५० वर्षांनी जाणवेल, असं ते म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रणासोबतच धार्मिक आधारावर लोकसंख्या संतुलन राखणेही गरजेचं आहे, असं मोहन भागवत म्हणाले. लोकसंख्या वाढीकडे दुर्लक्ष केल्यास दुप्षपरिणाम भोगावे लागणार आहेत. लोकसंख्या वाढल्याने अनेक ठिकाणी नवे देश निर्माण झाले आहेत. इंडोनेशियातून इस्ट तिमोर, सुडानपासून दक्षिण सुडान आणि सर्बियापासून कोसोवा असे नवे देश लोकसंख्या वाढल्यामुळेच जन्माला आले आहेत. दिर्घकाळ बैठक घेऊन आणि चर्चा करूनच लोकसंख्या नियंत्रणासाठी नीती तयार केली पाहिजे, असंही मोहन भागवत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -