घरमहाराष्ट्रआले शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आणि म्हणाले...

आले शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी आणि म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या शिवसेनेच्या इतिहासातील पहिल्या दोन दसरा मेळाव्यांची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करत खऱ्या शिवसेनेवर दावा केला तसेच आता मुंबईतील बीकेसी मैदानावर वेगळ्या दसरा मेळाव्याचे आयोजन केले. यात शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवाजी पार्कवर होत आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापेक्षा सर्वाधिक गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटात ताकद लावत आहे. त्यासाठी मुंबईसह राज्यभरातील आमदारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते मेळाव्याच्या ठिकाणी जमत आहेत, मात्र नेमका मेळावा कोणाचा आणि हे कार्यकर्ते नेमक्या कोणाच्या मेळाव्याला आलेत, हेच त्या कार्यकर्त्यांना सांगता येत नसल्याचे समोर आलं आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटाचा हा पहिलाच मोठा मेळावा आहे. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार आपापल्या कार्यकर्त्यांना मतदार संघातून बसगाड्यांमधून भरून घेऊन येत आहेत. मात्र खरे शिवसैनिक कमी आणि मुंबई दर्शनासाठी आणि मोफत फिरायला मिळतयं म्हणून आलेले सर्वाधिक असल्याचे दिसतेय.

- Advertisement -

दसरा मेळाव्यासाठी मुंबईत आलेल्या तरुण – तरुणी अबालवृद्धांशी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीनींनी संवाद साधला. ज्यावर अनेक कार्यकर्त्यांनी अनपेक्षित उत्तरं दिलं. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मेळाव्यासाठी अनेक बस बुक केल्या होत्या. तर अनेक खासगी गाड्याही बुक केल्या होत्या. सिल्लोडसह आसपासच्या मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते या मेळाव्यासाठी मुंबईत आले आहेत. मात्र मुंबईत ते नेमक्या कोणाच्या मेळाव्यासाठी जात आहेत? तिथे कोणाचे भाषण करणार आहेत? दसरा मेळाव्याबद्दल काही माहिक आहे का? यापैकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं या लोकांना देता आली नाही. काहींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नावही माहिती नसल्याची वस्तुस्थिती दिसून आली.

यावेळी काहींनी आनंद शिंदे यांना ऐकण्यासाठी मुंबईत जातोय असं सांगितलं तर काहींनी सत्तार शेठ यांची सभा ऐकण्यासाठी मुंबईला चाललो असेही बहुतेकांनी सांगितले. सत्तार यांनी बुक केलेल्या गाडीतून निघालेल्या एका व्यक्तीने तर उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेला चाललोय असं उत्तर दिले. यामुळे शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक किती आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. केवळ गर्दी जमवून ताकद दाखवणं एवढाच मेळाव्याचा हेतू असल्याचे यावरून बोललं जात आहे.


पंकजा मुंडे कोणाचं भाषण ऐकणार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -