घरदेश-विदेशमंकीपॉक्सविरोधी वॅक्सिनसाठी केंद्र सरकारने मागवल्या निविदा

मंकीपॉक्सविरोधी वॅक्सिनसाठी केंद्र सरकारने मागवल्या निविदा

Subscribe

भारतासह जगभरात कोरोनानंतर आता मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले आहे. हा आजार रोखण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. तर काही देशांनी यावर प्रभावी लसीवर देखील काम सुरु केले आहे. अशात केंद्र सरकारनेही विविध लस उत्पादक कंपन्यांकडून मंकीपॉक्स विरोधी वॅक्सिनसाठी निविदा मागवल्या आहेत. केंद्र सरकारने सार्वजनिक-खासगी पार्टनरशीप पद्धतीने मंकीपॉक्सविरोधी लस आणि डायग्नोस्टिक किट तयार करण्यासाठी या निविदा मागवल्या आहेत. यासाठी केंद्र सरकारने अनुभवी लस उत्पादक आणि इन-विट्रो डायग्नोस्टिक किट उत्पादकांकडून स्वारस्य व्यक्त केले आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने सांगितले की, ते मंकीपॉक्स व्हायरसचे स्ट्रेन उपलब्ध करण्यास तयार आहे.
तसेच मंकीपॉक्स आजाराविरोधात लस संशोधन आणि विकासासाठी सार्वजनिक- खाजगी पार्टरशीप पद्धतीने संयुक्त सहकार्यास आमंत्रित करु इच्छितात. मंकीपॉक्स व्हायरसच्या विशिष्ट आयसोलेटचा वापर करून संशोधन आणि विकास प्रमाणीकरणासह लस आणि डायग्नोस्टिक किट निर्मितीच्या कामास सहकार्य करण्यासही ते तयार आहेत.

- Advertisement -

दरम्यान मंकीपॉक्सविरोधी लस उत्पादकांना 10 ऑगस्टपर्यंत निविदा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात जागतिक आरोग्य संघटनेनेही आता मंकीपॉक्सविरोधात लस तयार करण्याचे आवाहन केले आहे. यावर WHO ने म्हटले की, कोरोनाविरोधी लसीमुळे लाखो नागरिकांचे प्राण वाचले आहेत. तसेच संसर्ग अनियंत्रित होण्यापासून रोखता आला. त्यामुळे मंकीपॉक्सच्या बाबतीतही त्याचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार आणि खासगी क्षेत्राने संयुक्तपणे नवीन लस विकसित करणे गरजेचे आहे. ज्यामुळे रोग पुन्हा होण्यापासून प्रतिबंध केला जाईल.

आत्तापर्यंत जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचे 18 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 78 देशांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 70 टक्के रुग्ण हे युरोपियन देशांमध्ये आणि 25 टक्के अमेरिकेत आढळून आली आहेत. आत्तापर्यंत पाच रुग्णांचा मंकीपॉक्समुळे मृत्यू झाला आहे. तपर 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे. त्यामुळे मंकीपॉक्सबाबत सर्व देशांनी सहकार्याची भूमिका घेत आजार रोखण्यासाठी संशोधन आणि विकास उपक्रमांना चालना द्यावी, असे मत WHO ने व्यक्त केले आहे.


यंदा चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव सुसाट; राज्य सरकारकडून टोल माफी जाहीर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -