घरदेश-विदेशगोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी, जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्बची धमकी, जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Subscribe

मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या चार्टर्ड विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. गोवा एटीसीला आलेल्या एका मेलमध्ये विमानात बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली होती, यानंतर विमानाचे तात्काळ गुजरातमधील जामनगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर विमानातील सर्व 244 प्रवाशांना सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले आहे. दरम्यान आता विमानाची कसून चौकशी सुरु आहे. रशियाच्या अधिकृत माध्यमांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.

जामनगर विमानतळावर बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून सध्या विमान आयसोलेशन बेमध्ये असून पुढील तपास सुरु आहे. तसेच एनएसजी कमांडोही विमानतळाकडे रवाना झाले आहेत. जामनगरचे जिल्हाधिकारी सौरभ पारघी यांनी सांगितले की, सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावर जाऊन 9 तास तपास केला. विमानात प्रवाशांचे असलेले सामान आणि इतर सर्व वस्तू तपासण्यात आल्या. बीडीडीएस (बॉम्ब निकामी पथक) आणि स्थानिक अधिकारी संपूर्ण विमानाचा अद्याप तपास करत आहे.

- Advertisement -

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. विमानतळावरील सर्व आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विमानतळ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.


गद्दारांना हे कधी कळणार?, गिरीश महाजनांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा सवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -