घरदेश-विदेशMukesh Ambani : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा पहिल्या क्रमांकावर; गौतम अदानी...

Mukesh Ambani : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी पुन्हा पहिल्या क्रमांकावर; गौतम अदानी कितव्या स्थानावर?

Subscribe

नवी दिल्ली : श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. गौतम अदानी गेल्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये पहिल्या क्रमांकावर होते.

हुरुन इंडियाने देशातील श्रीमंतांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती अदानीपेक्षा 3.3 लाख कोटी रुपये जास्त आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 8 लाख कोटींहून अधिक आहे. यादीनुसार, 66 वर्षीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे ते पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Shahid Latif : पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाईंडला कंठस्थान; दहशतवादी लतीफला पाकिस्तानात गोळ्या घातल्या

हिंडेनबर्ग प्रकरणामुले अदानीचे मोठे नुकसान

2023 मध्ये शॉर्ट शेलिंग कंपनी हिंडेनबर्गच्या अहवालामुळे गौतम अदानी यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते . त्यामुळे गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत लक्षणीय घट झाली. याचा फटका गौतम अदानी यांना बसला आणि ते हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यांची संपत्ती 57 टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या अदानीची एकूण संपत्ती 4,74,800 कोटी रुपये आहे.

- Advertisement -

10 श्रीमंतांपैकी दोन जणांच्या संपत्तीत घट

हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीत सायरस पूनावाला तिसऱ्या तर, एचसीएल टेकचे शिव नाडर चौथ्या स्थानावर आहेत. हुरुन इंडियाच्या मते, गेल्या एका वर्षात पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाच्या एकूण संपत्तीत सर्वाधिक 73,100 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तर याच कालावधीत शिव नाडर यांची एकूण संपत्ती 23 टक्क्यांनी वाढली आहे. अव्वल 10 श्रीमंतांपैकी फक्त दोन जणांच्या संपत्तीत घट झाली आहे. या कालावधीत अदानी यांच्या संपत्तीत 57 टक्के आणि राधाकिशन दमानी यांच्या संपत्तीत 18 टक्क्यांनी घट झाली आहे. या यादीत झेप्टोचे संस्थापक 20 वर्षीय कैवल्य वोहरा हे सर्वात तरुण श्रीमंत व्यक्ती आहेत. मात्र बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन हे टॉप श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत.

हेही वाचा – Israel-Palestine : इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय अभिनेत्रीच्या घरावर शोककळा; बहीण अन् मेहुण्याचा मृत्यू

झोहोच्या राधा वेंबू यांना सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिलेचा दर्जा प्राप्त

हुरुन इंडियाच्या यादीत सर्वाधिक 133 श्रीमंत व्यक्ती फार्मा क्षेत्रातील आहेत. या यादीत रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील 109 श्रीमंत आणि औद्योगिक उत्पादने क्षेत्रातील 96 जणांना स्थान मिळाले आहे. झोहोच्या राधा वेंबूने न्याकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर यांचा पराभव करत सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिलेचा दर्जा प्राप्त केला आहे. दरम्यान, कॉन्फ्लुएंटच्या 38 वर्षीय संस्थापक नेहा नारखेडे या यादीतील सर्वात तरुण सेल्फ मेड महिला आहेत. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक 1.26 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यांच्यानंतर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा आहेत. महिंद्राच्या फॉलोअर्सची संख्या 1.08 कोटी आहे. यादीत समाविष्ट श्रीमंतांची सरासरी संपत्ती 9.3 टक्क्यांनी घटली असली तरी एकूण संपत्ती 8.5 टक्क्यांनी वाढली आहे.

श्रीमंतांच्या यादीत महेंद्र रतीलाल मेहता यांना पहिल्यांदा स्थान

हुरुन इंडियाच्या यादीत प्रिसिजन वायर्स इंडिया कंपनीचे 94 वर्षीय महेंद्र रतीलाल मेहता यांना पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. हुरुनच्या मते, गेल्या एका वर्षात भारतात दर तीन आठवड्यांनी दोन नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे, त्यामुळे आता देशातील अब्जाधीशांची संख्या 259 वर पोहोचली आहे. गेल्या 12 वर्षांत अब्जाधीशांची संख्या 4.4 पटीने वाढली आहे. यावर्षी 51 श्रीमंत लोकांची संपत्ती दुप्पट झाली आहे. या यादीत सर्वाधिक 328 श्रीमंत मुंबईतील आहेत. दिल्लीतील 199 आणि बेंगळुरूमधील 100 जणांना त्यात स्थान मिळाले आहे. तिरुपूरला प्रथमच टॉप 20 शहरांमध्ये स्थान मिळाले आहे. उद्योग क्षेत्रातील दिग्गज आणि केद्रा समूहाचे मनीष केजरीवाल हे या यादीत स्थान मिळवणारे खाजगी इक्विटी क्षेत्रातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3,000 कोटी रुपये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -