घरताज्या घडामोडी'हा' तालिबानी नेता चालवणार अफगाणिस्तान सरकार

‘हा’ तालिबानी नेता चालवणार अफगाणिस्तान सरकार

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबान आज सरकार स्थापन करणार असून तालिबानी नेता मुल्ला बरादर याच्या नेतृत्वाखाली हे नवं सरकार काम करणार आहे.

‘रॉयटर्सने’ तालिबानचा हवाला देत काबुल मध्ये शुक्रवारी तालिबान नवीन सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली आहे. मुल्ला बरादर याच्या हातात जरी सरकारची कमान असली तरी तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला मोहम्मद याकूब, शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझई यांना देखील नवीन सरकारमध्ये महत्वाची पदे देण्यात आली आहेत. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमधून गेल्यानंतर तालिबानने नवीन सरकार स्थापनेच्या हालचालीस सुरुवात केली होती. काबुलमधील राष्ट्रपती भवनात हा सरकार स्थापनेचा सोहळा होणार आहे. यासाठी राष्ट्रपती भवनात सजावट करण्यात आली असून नवीन झेंडेही लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

कोण आहे मु्ल्ला अब्दुल गनी बरादर
मुल्ला अब्दुल गनी बरादर हा तालिबानमधील दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे. १९९६ ते २००१ पर्यंत तालिबानने अफगाणिस्तानवर राज्य केलं होतं. त्यावेळी मुल्ला बरादरने सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. पण २००१ नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात एन्ट्री केल्यावर मुल्ला बरादर पाकिस्तानमध्ये गेला. त्यानंतर २०१० मध्ये पाकिस्तान सरकारला विश्वासात न घेता अफगाणिस्तान सरकारशी बोलणी केल्याच्या आरोपाखाली त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.

मात्र २०१८ साली अमेरिकेने तालिबानशी बोलणी सुरू केल्यानंतर मुल्ला बरादरला सोडण्यात आले होते. त्यानंतर कतारची राजधानी असलेल्या दोहामध्ये तो गेला. तिथे राहून मुल्लाने तालिबान आणि अमेरिका यांच्यात महत्वपू्र्ण चर्चाही घडवून आणल्या होत्या.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -