घरताज्या घडामोडीमुंबईत हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लॅन्टजवळ दगाफटका होऊ शकतो - महापौर

मुंबईत हॉस्पिटलच्या ऑक्सिजन प्लॅन्टजवळ दगाफटका होऊ शकतो – महापौर

Subscribe

नाशिकमध्ये झालेला ऑक्सिजन टॅंक लिक होण्याचा अपघात घडला आहे. पण कदाचित अशा प्रकारचा अपघात घडवलाही जाऊ शकतो, असे धक्कादायक वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. नाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलेल्या खबरदारीबाबतची माहिती पत्रकारांना देताना त्यांनी हे वक्तव्य केले. कोरोनाच्या काळात सध्या खूपच पॅनिक झालेले लोक आहेत. त्यामुळेच नाशिकचा अपघात असला तरीही अशा प्रकारचा अपघात हा घडवला जाऊ शकतो अशी शक्यता त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळेच यापुढच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टच्या जागा या मनुष्य विरहीत ठेवण्यात येतील. तसेच सुरक्षा रक्षकांमार्फत याठिकाणी गस्तही घालण्याची सूचना महापौरांनी यावेळी मांडली. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लॅन्टच्या ठिकाणी कोणीही जाऊन काहीही करू शकतो. त्यामुळेच रिस्क घ्यायची नाही असेही महापौर म्हणाल्या.

ऑक्सिजन प्लॅन्टच्या ठिकाणी १० मीटर अंतरावर बॅरिकेट्स लावण्यात येणार असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले. तसेच नियमितपणे ऑक्सिजन पुरवठ्याची यंत्रणा सुरळीत आहे का ? याची तपासणी करण्याचेही आदेशही मुंबईतील हॉस्पिटल्सला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ज्याठिकाणी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था आहे, अशा ठिकाणीही योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश नाशिकच्या घटनेनंतर देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. खाजगी बेड्सच्या रूग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन बेड्सच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टचे ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले. नाशिकच्या घटनेनंतर मुंबईतही अधिक खबरदारी आणि सुरक्षेच्या उपाययोजना सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. ऑक्सिजन प्लॅन्टच्या ठिकाणी यापुढच्या काळात थेट प्रवेश कोणालाही मिळणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. आतापर्यंत कुर्ला भाभा, वांद्रे भाभा हॉस्पिटल, शताब्दी हॉस्पिटल याठिकाणी ऑडिट करण्यात आल्याचेही महापौरांनी सांगितले. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या प्लॅन्टच्या ठिकाणी कोणीही जाऊन काहीही करू शकतो. त्यामुळेच रिस्क घ्यायची नाही असेही महापौर म्हणाल्या.

- Advertisement -

ज्याठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्ट आहेत, त्याठिकाणची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबुत करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांची नेमणुक ऑक्सिजन प्लॅन्टजवळ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच याठिकाणी सुरक्षा रक्षकांनी दर अर्ध्या तासाने गस्त घालावी असेही महापौर म्हणाल्या. मुंबईतील हॉस्पिटलच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टमध्ये यापुढे कोणालाही थेट प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच नियमितपणे या ऑक्सिजन प्लॅन्टचे ऑडिटही होईल असेही महापौरांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -