घरदेश-विदेशभारतात मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनची उपलब्धता अधिक ! पण पुरवठा का होतेय कमी...

भारतात मागणीच्या तुलनेत ऑक्सिजनची उपलब्धता अधिक ! पण पुरवठा का होतेय कमी ? जाणून घ्या

Subscribe

ऑक्सिजनची मागणी दररोज ५००० मेट्रिक टनवर पोहचली आहे.

देशभरात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असून अनेक रुग्णांना मोठ्याप्रमाणात ऑक्सिजनची गरज भासतेय. मात्र ऑक्सिजन पुरवठ्यापेक्षा मागणाी वाढल्याने अनेक रुग्णांलयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान कोरोनामुळे गंभीर अवस्थेत असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागत आहे. अनके राज्यात ऑक्सिजन सप्लायर दुकांनाबाहेर रुग्णांचे नातेवाईक गर्दी करता असल्याचे चित्र आहे. अनेकांना रुग्णालयता भर्ती असणाऱ्या रुग्णासाठी तर काहींना घरातच कोरोनाच्या गंभीर लक्षणांशी झुंज देणाऱ्या रुग्णासाठी ऑक्सिजन पाहिज. परंतु ऑक्सिजन आता कोणी उधार देण्यासाठीपण तयार नाही. त्यामुळे कोरोनाच्या गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

देशात जाणवणाऱ्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने अनेक औद्योगिक क्षेत्रांतील ऑक्सिजन पुरवठ्यावर बंदी घातली आहे. जेणेकरुन अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा वाढवता येईल. देशातील फक्त ९ इंडस्ट्रीमध्येच ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे. दरम्यान रिलायन्स, टाटा स्टील, जिंदल स्टील उद्योग समुहाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठा सुरु केला आहे. खत निर्मिती करणारी सहकारी संसथाय इफ्को(IFFCO) ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करत आहे. या माध्यामातून रुग्णालयांमध्ये मोफत ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. तसेच ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी ५०००० मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

मागणीत मोठी वाढ

कोरोना संसर्गाच्या आधी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन(LMO)ची मागणी दररोज सरासरी 700 मेट्रिक टन होती. यात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी ७०० वरून थेट २८०० टन दररोज होऊ लागली. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हीच मागणी दररोज ५००० मेट्रिक टनवर पोहचली आहे. त्यामुळे भारतात दररोज ऑक्सिजनचे उत्पादन मागणीपेक्षा पुरवठा अधिक आहे. १२ एप्रिलच्या आकडेवारीनुसार भारतात ऑक्सिसन एका दिवसची उत्पादन क्षमता ७२८७ मेट्रिक टन इतकी आहे. आणि रोजचा खप ३८४२ मेट्रिक टन आहे. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी जरी ५००० मेट्रिक टनवर पोहचली तरी उत्पादन क्षमतेपेक्षा कमीच आहे.

पुरवठा नेमका होत का नाही ?

देशात मेडिकल आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा ५० हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. परंतु इंडस्ट्रीयल ऑक्सिजनचे मेडिकल ऑक्सिजनमध्ये रुपांतर करण्यासाठी त्याला ९३ टक्के शुद्ध करावे लागते. परंतु या ऑक्सिजनला ठरावीक रुग्णालयांपर्यंत पोहचवण्यात अनेक अडचणी येत आहेत.

- Advertisement -

या ‘तीन’ अडचणींमुळे ऑक्सिजन तुटवडा ?

लिक्विड ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी देशात सध्या क्रायोजेनिक टॅंकर मुबकल प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे साठा उपलब्ध असतानाही तो रुग्णलयांपर्यंत पोहचवायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचदरम्यान कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय. त्यामुळे देशात ऑक्सिजन सिलेंडरसह त्यासह वापरण्यात येणारी उपकरणांचा तुटव़डा भासत आहे. याच कारणांमुळे देशातील अनेक राज्यांतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तुटवडा निर्माण होत आहे.


हेही वाचा- कोरोना लस घेणाऱ्या १० हजारांपैकी फक्त २ ते ४ जण पॉझिटिव्ह- आयसीएमआर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -