घरताज्या घडामोडीराष्ट्रगीताच्या अपमानाचे प्रकरण : ममता बॅनर्जींना दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून समन्सला स्थगिती

राष्ट्रगीताच्या अपमानाचे प्रकरण : ममता बॅनर्जींना दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून समन्सला स्थगिती

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेल्या समन्सला मुंबई सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ममता बॅनर्जी यांना २ मार्च रोजी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्यांतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी दाखल केलेल्या गुन्ह्यात समन्स बजावण्यात आले होते. पुढील सुनावणीची तारीख २५ मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. तेव्हा त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली होती. या दौऱ्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला होता.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

२ फेब्रुवारीला मुंबईच्या सत्र न्यायालयाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना २ मार्चला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात राष्ट्रगीताचा अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने त्यांना हे आदेश दिले होते. मुंबईमधील भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी ही तक्रार दाखल केली होती.

ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्या तरी, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मंजुरीची आवश्यकता नाही आणि त्या अधिकृत कर्तव्य बजावत नसल्यामुळे कोणताही प्रतिबंध लागू नाही होत नाही. भाजप मुंबई युनिटचे कार्यकर्ता विवेकानंद गुप्ता डिसेंबर २०२१ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात तक्रार घेऊन माझगाव येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात पोहोचले होते.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मुंबई भेटीत राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला होता. गुप्ता यांनी या प्रकरणी बॅनर्जींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. तसेच ममता बॅनर्जी यांना २ मार्च २०२२ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु आता मुंबई सत्र न्यायालयाकडून समन्सला स्थगिती देण्यात आली असून ममता बॅनर्जींना मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा : IND v SL 2nd T20 : टीम इंडिया दुसऱ्या टी-२० मालिकेसाठी सज्ज, श्रीलंका प्रत्यूत्तर देण्यास तयार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -