घरताज्या घडामोडीमाझे अश्रू त्यांच्या बलिदानाला ठेच पोहोचवणार...

माझे अश्रू त्यांच्या बलिदानाला ठेच पोहोचवणार…

Subscribe

पल्लवी यांनी सांगितले की, आशुतोष यांची वर्दी हेच त्यांचं स्वप्न आणि संसार. त्यांना आपल्या वर्दीवरच गर्व होता.

शहीद कर्नल आशुतोष शर्मा यांची पत्नी पल्लवी यांनी हिमतीने सांगितले की, माझे पती शहीद झाले असून मी अश्रू वाहणार नाही. त्यांचे बलिदान माझ्यासाठी आणि देशासाठी गर्वाची गोष्ट आहे. माझे अश्रू त्याला ठेच पोहोचवणार. यावेळी आईचे डोळे ही पाण्याने भरून आले आहेत. पण आपल्या पराक्रमी मुलाच्या सन्मानासाठी डोळ्यातून पाण्याचा एक थेंब बाहेर त्यांनी काढला नाही. पल्लवी यांनी सांगितले की, आशुतोष यांची वर्दी हेच त्यांचं स्वप्न आणि संसार. त्यांना आपल्या वर्दीवरच गर्व होता.

भारतीय सीमेत घुसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात जे केले, तो त्यांचा निर्णय होता. मी आणि माझा परिवार त्यांच्या निर्णयाचा आदर करते. आणि संपूर्ण देशानेही हे केले पाहिजे. ते दरवेळी म्हणायचे की, देश हा माझा परिवार आहे आणि त्याची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. आपले ध्येय आणि वीरता त्यांनी चांगल्या प्रकारे निभावली आहे. माझ्या डोळ्यात ते दूर गेल्याचे दुःख नाही. मला या गोष्टीचा गर्व आहे की, मी वीर आशुतोष यांची पत्नी आहे. ज्यांनी देशासाठी हसत-हसत बलिदान दिले.

- Advertisement -

बाबा म्हणाले होते नंतर बोलतो

मुलगी तमन्ना जयश्री जयपूरच्या पेडीवाल स्कुलमध्ये इयत्ता सहावीची विद्यार्थीनी आहे. त्यांना ही माहीत होते की, आता पुन्हा वडिलांसोबत बोलणे होणार नाही. पाण्याने भरलेल्या डोळ्याने तमन्नाने सांगितले की, १ मे  रोजी त्यांच्या सोबत बोलणे झाले होते. तेव्हा बाबांनी सांगितले की, थोड्यावेळाने बोलतो. त्यानंतर तमन्ना जवळ बोलण्यासाठी शब्दच नव्हते आणि ओठ कापत होते. मात्र, चेहऱ्यावर पित्यासारखीच हिम्मत होती.

२८ फेब्रुवारी रोजी शेवटची भेेेट

आशुतोष यांची शेवटची भेट उधमपुरमध्ये २८ फेब्रुवारीला झाली. १ मे रोजी त्यांच्या सोबत फोनवर बोलणे झाले होते.

- Advertisement -

ते आपला धर्म निभावत होते

रात्रीपासूनच असे वाटत होते की काही चांगलं घडत नाही आहे. कारण त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नव्हता. मी समजून गेले की हे कोणत्या तरी ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -