घरदेश-विदेशनरेंद्र मोदी, आरएसएसचं नागपूरमधून संपूर्ण देशावर आक्रमण - राहुल गांधी

नरेंद्र मोदी, आरएसएसचं नागपूरमधून संपूर्ण देशावर आक्रमण – राहुल गांधी

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज, गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास नागपूर येथे जाहीर भाषण होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राहुल गांधींची ही पहिलीच सभा आहे. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी आज, त्यांनी वायनाडमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रीयेत नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना (आरएसएस) हे नागपूरमधून संपूर्ण देशावर आक्रमण करत आहेत, असे वक्तव्य केले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले राहुल गांधी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने संपूर्ण देशावर आक्रमण केलं आहे. नागपूरमध्ये आरएसएसचे मुख्यालय असून तिथून ते देशात आक्रमण करत आहेत. देशातील नागरिकांना असुरक्षित वाटतं आहे. त्यांच्या धार्मिक भावना आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधन येत आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभर मला सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून मी उत्तर आणि दक्षिण अशा दोनही विभागातून निवडणूक लढवत आहे.

- Advertisement -

राहुलने भरला उमेदवारी अर्ज 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल गांधी लोकसभा २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदारसंघासोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. त्याकरता आज ते अर्ज भरण्यासाठी केरळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीदेखील केरळमध्ये आल्या आहेत. राहुल गांधी यांनी आज सकाळी ११ वाजता कलपेट्टा येथील वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. तसेच ते केरळमध्ये रोड शो देखली करणार आहेत. रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -