Breaking : ‘जमात-ए-इस्लाम’चं कार्यालय सील; आता हुर्रियतवर होणार कारवाई

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जिल्हा हॉस्पिटलजवळ असलेल्या जमात-ए-इस्लामीच्या कार्यालयाला पोलिसांनी सील केलं आहे.

jk-leaders-together
जमात-ए-इस्लामचं कार्यालय सील

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जिल्हा हॉस्पिटलजवळ असलेल्या जमात-ए-इस्लामीच्या कार्यालयाला पोलिसांनी सील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव अजूनही निवळलेला नाही. सीमारेषेलगत असलेल्या राजौरी आणि पुंछ भागात मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. पुंछमध्ये झालेल्या गोळीबारात मोहम्मद युनूस जखमी झाले तर त्यांची पत्नी रबीना कौसर (वय ३२), फजान (वय ५) आणि मुलगी शबनम (९ महिने) यांचा मृत्यू झाला. मोहम्मद युनूस यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या गोळीबारात पाकने मोठ्या शस्त्रांचाही वापर केला असल्याचं समजते.

आता हुर्रियतवर लक्ष 

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये चोख बंदोबस्त ठेवला जात आहे. दहशतवाद्यांना मदत करू शकणाऱ्यांचाी झाडाझडती पोलिसांकडून घेतली जात आहे. यापूर्वीही काश्मिरमधील कट्टर फुटीरतावाद्यांच्या घरावर एनआयएने छापेमारी करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आता काश्मिरमधील जमात-ए-इस्लाम संघटेवरही पोलिंसांनी कारवाई केली असून पुढे हुर्रियत संघटनेवर कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे.