घरक्रीडाNational Shooter कोनिकाची आत्महत्या ; 'आज पूरे देश का दिल टूटा है'...

National Shooter कोनिकाची आत्महत्या ; ‘आज पूरे देश का दिल टूटा है’ म्हणत, सोनू सूद झाला भावूक

Subscribe

राष्ट्रीय नेमबाजपटू कोनिका लायक हिने आत्महत्या केली आहे. २६ वर्षीय कोनिका लायक ही झारखंडच्या धनबाजची रहिवासी होती.या नवोदित खेळाडूच्या मृत्यूमुळे क्रिडा जगताला मोठा धक्का बसला आहे. माझी ऑलंपियन आणि अजुर्न पुरस्कार विजेते जयदिप करमाकर यांच्यासोबत ती कोलकत्ता येथे प्रशिक्षण घेत होती. कोनिकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असता, संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

कोनिका सुरुवातीला रायफल वापरायची त्या रायफल तिच्या प्रशिक्षकांच्या किंवा मित्रांच्या असायच्या.त्यामुळे शूटिंगच्या वेळी ती त्याच रायफल वापरायची.जेव्हा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदला जेव्हा त्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने या नवोदित खेळाडूला मार्चमध्ये एक नवीन रायफल भेट दिली जेणेकरुन, ती तिच्या कलागुणांना आणखी वाव देऊ शकेल. दरम्यान, तिच्या मृत्यूमुळे अभिनेता सोनू सूदने ट्विट् करत शोक व्यक्त केला आहे. ‘ आज सिर्फ मेरा नहीं,सिर्फ धनबाज का नहीं,पुरे देश का दिल टूटा हे’,असे म्हणत, अभिनेता सोनू सूद भावूक झाला

- Advertisement -

 

- Advertisement -

 

याशिवाय थोड्या दिवसांनी कोनिकाचं लग्न सुद्धा होणार होतं.मात्र प्रसिद्ध नेमबाज कोनिका लायकने आत्महत्या करुन आपले जीवन संपवले. तिच्या आत्महत्येचे गुढ समजले नव्हते मात्र थोड्या वेळानंतर हावडा पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली त्यात कोनिकाने आपण नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी आणि स्वत:ला सिद्ध करण्यासाठी योग्य संधी मिळत नसल्याने नैराश्यात होती.

कोनिकाने झारखंंडच नाही तर, संपूर्ण खेळाच्या जगतात आपली नवी ओळख निर्माण केली आहे.धनबाजच्या धनसयारमध्ये राहणारी कोनिका लायक ही बालीच्या बीरेश्वर चटर्जी स्ट्रीट मधील मुक्ति महिला वसतिगृहात राहणारी होती. बुधवारी १५ डिसेंबरला ११ वाजता तिचा मृतदेह हा एका खोलीमध्ये लटकलेला पाहायला मिळाला.त्यामुळे त्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हावडा स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून एक लिखित सुसाईड नोट जप्त केली आहे, मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच काही सांगता येईल. पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करत आहेत.शवविच्छेदनाच्या रिपोर्टमुळे तिच्या आत्मह्त्येचे गुढ समोर येण्याची शक्यता आहे.

‘या’ राष्ट्रीय नेमबाज खेळाडूचीही आत्महत्या

१० ऑक्टोबर २०२१ ला सकाळी राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज हुनर सिंहने आत्महत्या केली होती. त्याने पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यात आपल्या रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.हुनर सिंह राष्ट्रीय स्तरावरील उत्तम नेमबाज होता. हुनर ​​सिंहने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन पंजाबचा डंका क्रिडा जगतात वाजवला होता. हुनर सिंहला ३ महिन्यांपूर्वी हाताला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो बराच सावरला होता मात्र, त्या सततच्या वेदनेमुळे नैराश्यातूनच त्यानेही आत्महत्या केली होती.


हे ही वाचा – निधी मिळवण्यात राष्ट्रवादीने शिवसेनेलाही टाकलं मागे, आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण खात्यालाही मोठा फटका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -