घरदेश-विदेशआजारपणाचे कारण सांगून तुरुंगवास टाळणारे नवाझ शरीफ पाकिस्तानात परतणार! पाकच्या गृहमंत्र्यांचा दावा

आजारपणाचे कारण सांगून तुरुंगवास टाळणारे नवाझ शरीफ पाकिस्तानात परतणार! पाकच्या गृहमंत्र्यांचा दावा

Subscribe

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री नवाझ शरीफ आजाराचे कारण सांगून तुरुंगातून पळून लंडन गेले होते. त्याच्याबद्दल आता मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तानात परतण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू झाल्यानंतर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) प्रमुख नवाझ शरीफ लंडनमधून परततील, असे त्यांनी म्हटले आहे.

एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री म्हणाले की, पाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांसाठी पीएमएल-एन पक्षाच्या तयारीचे नेतृत्व नवाझ शरीफ यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश आणि इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या प्रयत्नांना न जुमानता राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांतात 14 मे रोजी निवडणुका होणार नाहीत, असेही गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी केले आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ उपचाराचे कारण देत नोव्हेंबर 2019 मध्ये लंडनला गेले होते. नवाज जेव्हा लंडनला गेले तेव्हा त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आधीच दोषी ठरवण्यात आले होते आणि ते लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत होते. मात्र, नंतर वैद्यकीय कारणास्तव उच्च न्यायालयाने त्यांना चार आठवड्यांसाठी दिलासा दिला. दरम्यान, नवाज लंडनला पळून गेले आणि तेव्हापासून ते पाकिस्तानात परतले नव्हते.

मध्यावधी निवडणुकांसाठी तीव्र राजकारण
पाकिस्तानममध्ये प्रांतीय निवडणुका घेण्याचा मुद्दा राजकारणात सध्या गाजत आहे. इम्रान खान यांनी पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात मध्यावधी निवडणुका घेण्याचा आग्रह धरला होता. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानेही 5 एप्रिल रोजी पंजाबमधील निवडणुका 8 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय “असंवैधानिक” ठरवत निवडणुकांसाठी 14 मे ही तारीख निश्चित केली आहे. मात्र गृहमंत्री सनाउल्ला यांनी रविवारी फैसलाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, विरोधी पीटीआय पक्ष “सर्वोत्तम प्रयत्न” करत असूनही पंजाब विधानसभेची निवडणूक 14 मे रोजी होणार नाही. या वर्षी देशभरातील निवडणुका वेळापत्रकानुसार होतील आणि मे महिन्यात निवडणुका पार पडल्या नाहीत तर ऑक्टोबर महिना जास्त लांब नाही, असेही त्यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना उपद्रवी उल्लेख करत सनाउल्ला म्हणाले की, त्यांना एका षड्यंत्राखाली सत्तेवर आणले होते. “चार वर्षांपासून इम्रान खान (पीटीआय) यांच्या धोरणांमुळे देशासाठी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.” पीएमएल-एनचे नेते म्हणाले की, इम्रान खान यांनी दावा केला आहे की, ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) जाण्याऐवजी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतील. पण त्यांच्या सरकारने आमच्याशी नाही तर आयएमएफशी करार केला होता. त्यामुळे मागील सरकारच्या तडजोडीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -