घरCORONA UPDATEकोरोनाच्या संकटात सुरक्षा रक्षकांवर हल्ले करणार नाही

कोरोनाच्या संकटात सुरक्षा रक्षकांवर हल्ले करणार नाही

Subscribe

संपूर्ण जग कोरोनाशी सामना करत असताना नक्षलवाद्यांनीही सद्यस्थितीत सुरक्षा रक्षकांवर हल्ले करणार नाही अशी घोषणा केली आहे. नक्षलवाद्यांनी एक पत्रक जारी केले आहे. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओ)च्या मलकानगिरी , कोरापुट आणि विशाखा शाखेकडून ही घोषणा करण्यात आली आहे.

कोरोना हे मानवावर आलेले महासकंट आहे. यामुळे सुरक्षा रक्षकांवर हल्ला करणार नाही असे नक्षलवाद्यांशी संबंधित संघटनांनी जाहीर केले. त्याचबरोबर पत्रकासोबत एक ऑडीओही काढण्यात आला असून त्यातही सुरक्षा रक्षकांवरील हल्ले थांबवत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊनवरूनही नक्षलवाद्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. संकटकाळात गरींबाना सरकार मदत करत नसल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे.

- Advertisement -

.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -