घरCORONA UPDATEधक्कादायक! ४३ डॉक्टरांसह ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वॉरंटाइन

धक्कादायक! ४३ डॉक्टरांसह ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वॉरंटाइन

Subscribe

एका अपघातग्रस्त रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे आता ४३ डॉक्टरांसह ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

पिंपरी – चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४३ डॉक्टरांसह ५० वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली. त्यानंतर त्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्या रुग्णाची कोरोनाची चाचणी केली असता. ती पॉझिटिव्ह आल्याने ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

नेमके काय घडले?

३१ मार्च रोजी एका रिक्षा चालक असलेल्या व्यक्तीचा कासारवाडी येथे अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर पिंपरी – चिंचवड मधील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्या व्यक्तीची तातडीने चाचणी करुन त्याचे रिपोर्ट यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठवण्यात आले. तेव्हा, त्यामध्ये हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ९३ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट आज येणार आहेत, अशी माहिती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊन असतानाही असा केला प्रीतने नीतशी विवाह


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -