घरदेश-विदेशरिअल इस्टेट ग्रुपकडे सापडले तीन हजार कोटी रुपयांचे काळे धन

रिअल इस्टेट ग्रुपकडे सापडले तीन हजार कोटी रुपयांचे काळे धन

Subscribe

आयकर विभागाच्या छाप्यावेळी ही बाब समोर आली असून सीबीडीटीने संबंधित रिअल इस्टेट ग्रुपचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.

नोएडा एनसीआरमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका मोठ्या रिअल इस्टेट ग्रुपकडे तीन हजार कोटींपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचं उघडकीस आलं आहे. सीबीडीटी अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने नुकतीच याबाबतची माहिती दिली. आयकर विभागाच्या छाप्यावेळी ही बाब समोर आली असून सीबीडीटीने संबंधित रिअल इस्टेट ग्रुपचे नाव सांगण्यास नकार दिला आहे.

ग्रुपची बँक लॉकर सील

मागील आठवड्यात २५ ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी येथील एका रिअल इस्टेट ग्रुपकडे २५० कोटी रुपये एवढी रोख रक्कम सापडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडील ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. या ग्रुपने अनेक प्रॉपर्टीच्या ट्रान्झॅक्शनवर टॅक्सही भरलेला नाही. जवळपास ३.७५ कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ताही जप्त केली आहे. ग्रुपने ३ हजार कोटींचा काळा पैसा असल्याचं मान्य केलं आहे. तसेच त्यावर टॅक्स देण्याची तयारी दर्शवली आहे. छाप्यानंतर संबंधित ग्रुपची ३२ बँक लॉकर सील करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -