घरताज्या घडामोडीनेपाळकडून भारत सीमेवर आणखी तीन सशस्त्र पोलीस आउटपोस्ट तयार करणार

नेपाळकडून भारत सीमेवर आणखी तीन सशस्त्र पोलीस आउटपोस्ट तयार करणार

Subscribe

सध्या चीनची फूस असल्याकारणाने नेपाळकडून भारताविरोधात आगळीक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. लिपुलेख सीमा प्रश्नावरून भारत आणि नेपाळमधील संबंध बिघडत असल्याचे दिसत आहे. चांगरू येथे नेपाळने मागील आठवड्यात २५ पोलिसांना पाठवून पोलिस चौकी तयार करण्यात आली होती. भारताच्या भूभागावर दावा केल्यानंतर आता नेपाळकडून भारताच्या सीमेवर आणखी तीन पोलीस चौकी तयार करण्यात येणार आहे.

माहितीनुसार, नेपाळ झुलाघाट, लाली आणि पंचेश्वर या सीमावर्ती भागात सशस्त्र पोलीस चौकी उभारणार आहे. या तिन्ही भागातून भारत आणि नेपाळमध्ये येण्यासाठी पूलाचा वापर केला जातो. येत्या तीन आठवड्यात या पोलिस चौक्या तयार होणार आहेत.

- Advertisement -

भारत, नेपाळ आणि चीनच्या सीमा लिपुलेख भागात एकत्र येतात. त्यामुळे चीन नेपाळचा वापर करू हा कट रचत असल्याची चर्चा आहे. लिपुलेख येथे ८० किलोमीट लांब असलेल्या रस्त्याचे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उद्धघाटन केले होते. तिबेट येथे जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा समजला जातो. नेपाळने याच परिसरावर आपला दावा केला आहे. पण भारताने हा दावा फेटाळला आहे. आपल्या हद्दीत असलेल्या रस्त्याचे काम भारताने पूर्ण केले असून नेपाळने आक्षेप घेण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन मीटर अंतर पुरेसे नाही!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -